जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर टोमॅटोचा रस प्यायल्याने होणारे कमालीचे बदल सांगितले तर मात्र तुम्ही आजपासूनच टोमॅटोचा रस प्यायला सुरूवात कराल. कारण आपल्या स्वयंपाकघरात रोज दिसणारा टोमॅटो, केवळ भाजीतला रंग बदलत नाही तर आरोग्याचा रंगही बदलू शकतो.
टोमॅटो हा एक नैसर्गिक औषधाचा खजिना आहे. त्यामुळे टॉमेटोचा रस रोज प्यालात तर तुम्हाला रोजच्या जीवनात अनेक महत्त्वाचे फायदे होऊ शकतात. टोमॅटोमुळे होणारा पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे टोमॅटोमध्ये असलेले घटक ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ कमी करून ‘गुड कोलेस्ट्रॉल’ वाढवतात. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारून हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते. दुसरं म्हणजे दररोज टोमॅटोचा रस प्यायल्याने किडनी आणि मूत्रसंस्था स्वच्छ राहते. यामुळे युरिनच्या समस्यांना पुर्णविराम मिळतो. तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.
आपल्या शरीरात जेव्हा एखादा बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम लगेच आपल्या चेहऱ्यावर दिसतो. जसे की, आपण अतिउष्ण पदार्थ खाल्ले तर चेहऱ्यावर पुरळ ...
तिसरं म्हणजे टोमॅटोमध्ये मुबलक ‘व्हिटॅमिन के’ असतं. त्यामुळे हाडे मजबूत होतात. टॉमेटोच्या रसामुळे वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर महिनाभर टॉमेटोचा रस प्या. जे लोक फिटनेसकडे लक्ष देतात, त्यांच्यासाठी तर टोमॅटोचा रस नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे. शरीराप्रमाणेच त्वचेलाही टोमॅटोचा फायदा होतो. टोमॅटोतील लाइकोपीन हे अँटिऑक्सिडंट त्वचेवरील डाग कमी करतात आणि सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करतात. त्यामुळे टोमॅटोमुळे चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो!
आता तुम्हाला टोमॅटोचा रस कसा करावा असा प्रश्न पडला असेल?
टोमॅटोचा रस करण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवा, कापा आणि मिक्सरमध्ये वाटा. त्यात थोडं मीठ, काळी मिरी, आलं आणि लिंबाचा रस मिसळा. अशाप्रकारे तुम्ही रोज टोमॅटोचा रस प्यायलात तर नक्कीच शरीराला महत्त्वाचे फायदे होतील.