मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना


मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधित आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापन अधिकाधिक प्रभावी होण्याकरिता मोनो व मेट्रो सेवा प्राधिकरणांनी त्यांच्या स्तरावरील आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांकडे सादर करावा, अशा सूचना मुंबई उपनगर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी केल्या. तर आपत्कालीन व्यवस्थापनाविषयी निर्धारित करण्यात आलेल्या सुनिश्चित कार्यपद्धतीचे नियमितपणे विश्लेषण करण्यासह सुसज्जता वेळोवेळी तपासण्याकरिता आपत्कालीन व्यवस्थापन कवायत अर्थात 'मॉक ड्रिल' नियमितपणे आयोजित करावी, अशा सूचना मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत.


रविवारी १९ ऑगस्ट २०२५ रोजी चेंबूर येथील भक्तीपार्क नजीक तांत्रिक कारणास्तव मोनोरेल थांबून प्रवासी अडकल्याची घटना घडली होती. या घटनेच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांचा प्रतिसाद आणि सजगता याबाबतच्या तयारीचा आढावा घेणारी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक बुधवारी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे पार पडली. या बैठकीला दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांचे अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, मुंबई महानगरपालिकेचे संबंधित उपायुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईचे रवी सिन्हा हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचबरोबर राज्य आपत्ती निवारण कक्ष, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, अदाणी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर, मुंबई पोलीस दल इत्यादींचे संबंधित अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.


या बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले की, विविध प्रकारच्या आपत्कालीन घटनांची संभाव्यता लक्षात घेऊन उद्भवलेली परिस्थिती सुयोग्यपणे हाताळण्यासाठी मोनो रेल्वे सह भुयारी मेट्रो रेल्वे सेवा व उन्नत मेट्रो रेल्वे सेवा पुरविणा-या संस्थांनी त्यांच्या स्तरावरील 'सुनिश्चित कार्यपद्धती' आणि आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा यांच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांकडे सादर करावा. तर मुंबई शहर जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. अश्विनी जोशी यांनी मोनोरेल, मेट्रो रेल्वे यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांच्या ठिकाणी नियमितपणे 'मॉक ड्रिल' घेण्याच्या सूचना केल्या.



मुंबई महानगरामध्ये वाहतुकीच्या वाढत्या साधनांसोबतच एखाद्या आपत्कालीन प्रसंगी यंत्रणांचा प्रतिसाद आणि सुसज्जता याबाबतची चाचपणी करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी बैठकीदरम्यान दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून सांगितले. तर मुंबई आयआयटीचे प्राध्यापक डॉ. रवी सिन्हा यांनी दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी मोनोरेलविषयक आपत्कालीन परिस्थिती सुयोग्यरित्या हाताळल्याबद्दल मुंबई महानगरपलिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, मुंबई अग्निशमन दल व महानगरपलिका प्रशासनाच्या या कार्याचे बैठकीदरम्यान कौतुक केले.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे