मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरांत सुपरिचित झालेली अभिनेत्री सुपर्णा श्याम लवकरच 'ऊत' या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात सुपर्णा 'गुलाब' या कणखर मध्यमवर्गीय गृहिणीच्या व्यतिरेखेत दिसणार आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
स्वतंत्र विचारसरणीच्या गुलाबचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवताना 'प्रेम' व 'लग्न' या दोन्ही गोष्टी ती कशा पद्धतीने हाताळते हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्त्री विश्वाभोवती फिरणारा विषय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राम मलिक यांनी केले आहे.
मुंबई: 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे योगिता आणि समीर चौगुले यांनी एक वर्षापूर्वी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ ...
चित्रपटातील आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना सुपर्णा सांगते, ‘या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. ही अशा प्रेमाची कथा आहे जी कदाचित आपल्या अवतीभवती देखील असू शकते. प्रेम जिंकत आपण ते कसे निभावतो? याची कथा दाखवताना प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन 'ऊत' या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
सुपर्णा सोबत राज मिसाळ आणि आर्या सावे ही नवी जोडी या चित्रपटात दिसणार आहे. राजकुमार तांगडे, अनिकेत केळकर, प्राजक्ता केळकर, पुरषोत्तम वाघ, शैलेश कोरडे, अर्चना रावल, दीपक पाटील, वैदही ठाकूर, सिद्धेश्वर थोरात, अभय कुलकर्णी, श्रेया देशमुख, धनश्री साटम आदि कलाकारांच्या सुद्धा यात भूमिका आहेत.





