कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एसटी महामंडळ तब्बल ११५० जादा बस सोडण्याची तयारी केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.


पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या 'चंद्रभागा' या यात्रा बसस्थानकावरून दिनांक २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे. या बसस्थानकावर १७ फलाट असून सुमारे १००० बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे. तसेच सर्व एसटी कर्मचारी ब अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय देखील या बसस्थानकामध्ये करण्यात आली आहे.


प्रत्यक्ष यात्रेदिवशी एसटी बसेसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चंद्रभागा बसस्थानकावर तब्चल १२० पेक्षा जास्त एसटी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. वाहन दुरुस्ती व देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ बिघाड वाहने दुरुस्त करण्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत.


गरोदर माता, व स्तनदा मातांसाठी बसस्थानकावर हिरकणी कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. मागील वर्षी कार्तिकी यात्रेमध्ये एसटीने तब्बल १०५५ जादा बसेसच्या माध्यमातून जवळजवळ ३ लाख ७२ हजार भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली असून त्याद्वारे सुमारे ६ कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.



गाव ते पंढरपूर थेट सेवा


यात्रा कालावधीमध्ये ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास आपल्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाने बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ५० टक्के व ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी भाविक प्रवाशांनी येता-जाता आपल्या गावातून गट आरक्षणा करावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट