Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या विकासाला गती; FDI साठी विशेष अधिकारी पद, जात प्रमाणपत्र, रेल्वे निधी... कॅबिनेटचे ७ मोठे धमाके!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२८ ऑक्टोबर) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात परकीय गुंतवणूक (Foreign Investment) वाढवण्यासाठी मंत्रालयात एका नवीन विशेष सेलची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे. परकीय गुंतवणूक वाढवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या नव्या सेलमुळे मंत्रालयातील राजशिष्टाचार अधिकारी (Protocol Officer) यांना आता अधिकची आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार आहे. राजशिष्टाचार सांभाळण्यासोबतच आता या अधिकाऱ्याकडे थेट परकीय थेट गुंतवणूक (FDI), परदेशस्थ नागरिकांचे विषय तसेच आंतरराष्ट्रीय संबंध आणि संपर्क या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणार आहेत. या विशेष पदाला आणि नवीन सेलला मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने मान्यता देण्यात आली. यापूर्वी आयएफएस राजेश गावंडे यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर याबाबतचा प्रस्ताव औपचारिक मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता, ज्याला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय


१. नियोजन विभाग :


विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे एआय-आधारित विश्लेषण करून डॉक्युमेंट तयार. राज्य व जिल्हा पातळीवरील १६ संकल्पना निश्चित. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या अंतर्गत १०० उपक्रम निश्चित


२. गृह विभाग :


सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास व राज्य शासनाच्या ५० टक्के हिश्श्यानुसार अधिकचा निधी देण्यास मान्यता


३. सामान्य प्रशासन विभाग :


सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार. सचिव (राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणुक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क) / Secretary (Protocol, FDI, Diaspora Affairs and Outreach) अशा पदनाम विस्तारास मान्यता. याशिवाय परकीय थेट गुंतवणूक (FDI), आंतरराष्ट्रीय संपर्क (Outreach) आणि परदेशस्थ नागरिकांचे विषय (Diaspora Affairs) अशा तीन नवीन कार्यासनांच्या निर्मितीस आणि या कार्यासनांसाठी आवश्यक पदांना मंजुरी


४. नगरविकास विभाग :


महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी


५. ग्रामविकास विभाग :


ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणे, अध्यादेश २०२५ काढण्यास मान्यता


६. विधि न्याय विभाग:


धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय. याशिवाय शासकीय अभियोक्ता कार्यालय होणार. या दोन्हींसाठी आवश्यक पदांना व खर्चाच्या तरतुदीस मंजुरी.


७. महसूल विभाग


वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाउंडेशन, रिसोड यांना मौजे करडा ( ता. रिसोड) येथील २९.८५ हे. आर जमीन. या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नाममात्र दराने (एक रुपया) पुढील ३० वर्षाकरिता नुतनीकरणास मान्यता

Comments
Add Comment

Indigo Flight Cancellations : इंडिगोच्या गोंधळामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, असे करा प्रवासाचे नियोजन किंवा मिळवा रिफंड

मुंबई : देशातील सर्वात स्वस्त विमानसेवा म्हणून मिरवणाऱ्या इंडिगो कंपनीची आठवड्याभरात काही हजार उड्डाणं रद्द

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आयोगाने जाहीर केल्या नव्या तारखा

मुंबई : एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आयोगाने नव्या तारखा जाहीर करून

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची