भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात


मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली गेली. ज्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने २ विरुद्ध १ असा विजय मिळवला. उभय संघांमध्ये आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, टी-२० मध्ये भारतीय संघ नक्कीच जोरदार पलटवार करण्याच्या तयारीत आहे.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा थरार २९ ऑक्टोबरपासून रंगणार आहे. ही मालिका पाच सामन्यांची असल्यामुळे ती ऑक्टोबरमध्ये सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालेल. या मालिकेसाठी भारतीय संघात बदल झालेले दिसतील. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करत होता, तर आता टी-२० मध्ये कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादव यांच्या हाती असेल. या मालिकेत नवीन आणि युवा खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळेल.



भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक


टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे खेळला जाईल. यानंतर, दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. २ नोव्हेंबर रोजी मालिकेतील तिसरा सामना होबार्ट येथे खेळवण्याचे निश्चित झाले आहे. ६ नोव्हेंबर रोजी मालिकेतील चौथा सामना गोल्ड कोस्ट येथे होईल. त्यानंतर, ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेन येथे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाईल. या सामन्यासह या दीर्घ मालिकेची सांगता होईल.



सामने किती वाजता सुरू होणार?


वनडे मालिका सुरू असताना, भारतीय वेळेनुसार सामने सकाळी ९.३० वाजता सुरू व्हायचे आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपत होते. परंतु, आता टी-२० मालिकेचे सामन्यांसाठी वेळेत मोठा बदल झाला आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होतील. म्हणजेच, सामन्याचा पहिला चेंडू पाऊणे दोन वाजता टाकला जाईल. या वेळेच्या अर्धा तास आधी, म्हणजे १ वाजून १५ मिनिटांनी टॉस होईल. हे सामनेही सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत संपण्याची अपेक्षा आहे.



भारतात थेट प्रक्षेपण, लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहावे?


भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. तर थेट लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Comments
Add Comment

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत

ICC Womens World Cup 2025 : थरार निश्चित! ICC महिला विश्वचषक उपांत्य फेरीसाठी ४ 'बलाढ्य' संघ फिक्स; फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाचा सामना कुणासोबत?

नवी मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार आता संपला आहे. साखळी