Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

मालवणी भाषेला कलेचे रुप देणारे 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड!

मालवणी भाषेला कलेचे रुप देणारे 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड!

मुंबई: मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांचा पाया रचणारे प्रतिभावान नाटककार गंगाराम गवाणकर यांन४ वयाच्या ८६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. वयोमानानुसार सुरू असलेल्या शारिरीक समस्यांमुळे ते त्रस्त होते. अखेर मुंबईतील दहिसर येथे एका खासगी रुग्णालयात काल सायंकाळी (२७ ऑक्टोबर) त्यांची प्राणज्योत मालवली.

गंगाराम गवाणकर यांचे वस्त्रहरण हे नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजले. मालवणी भाषेला कलेद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचे काम वस्त्रहरणने केले. पु.ल. देशपांडे यांनीही वस्त्रहरण नाटकाची भरभरून प्रशंसा केली होती. या नाटकाचे तब्बल पाच हजारपेक्षा जास्त प्रयोग झाले. गंगाराम गव्हाणकर यांनी लिहिलेल्या याच नाटकातून मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा मालवणी नटसम्राट उदयास आला.

वस्त्रहरणप्रमाणेच गवाणकर यांनी दोघी, वनरूम किचन, वरपरीक्षा, वर भेटू नका अशा अनेक नाटकांची रचना केली आहे. गवाणकर यांच्या जाण्याने मराठी नाट्यविश्वाने एक सर्जनशील, लोकभाषेचा प्रामाणिक पुरस्कर्ता गमावला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >