मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागासाठी त्यांनी अद्ययावत जीवरक्षक प्रणाली म्हणजे व्हेंटिलेटर देणगी स्वरुपात दिले आहे. ज्याचा लाक्ष रुग्णालयात गंभीर स्थितीत जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना होणार आहे.
केईएम रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागामधील अद्ययावत व्हेंटिलेटर जुने झाले असल्याने नव्या यंत्राची आवश्यकता होती. यासंदर्भात अनुराधा पौडवाल यांना माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी ‘सूर्योदय फाऊंडेशन’ या त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अवघ्या चार दिवसांमध्ये रुग्णालयात व्हेंटिलेटरची उपलब्धता करून दिली. या यंत्राची किंमत साधारणपणे ३० लाख रुपये इतकी आहे.
यावेळी, अनुराधा पौडवाल आपले मत व्यक्त करताना म्हणाल्या की, संगीत हे एखाद्या उपचारामध्ये अतिशय परिणामकारक आहे. संगीतामध्ये उपचाराचा गुणधर्म आहे. त्यामुळे संगीताचा आधार घेऊन रूग्ण बरे व्हावेत, असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला.
मुंबई: मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांचा पाया रचणारे प्रतिभावान नाटककार गंगाराम गवाणकर यांन४ वयाच्या ८६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ...
व्हेंटिलेटरचे अनावरण सोमवार, २७ ऑक्टोबरला करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल व त्यांचे कुटुंबीय, नाना पालकर स्मृती प्रतिष्ठानचे सदस्य कृष्णा महाडिक, केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अनिता हरिबालकृष्णा आदी मान्यवर उपस्थित होते