बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट’ केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित तरुणीने शाहिद शेख नावाच्या तरुणासोबत हा करार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेकडे मदत मागितली.


मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने या कराराची प्रत स्वतःच्या आईला पाठवली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेकडे धाव घेतली. परिषदेकडून हस्तक्षेप झाल्यानंतर तरुणीला घरी आणण्यात आले, मात्र काही दिवसांनी ती पुन्हा घर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.


सदर तरुणी मालाड येथे शिक्षण घेत असताना शाहिद शेखच्या संपर्कात आली होती. या दोघांमध्ये ओळख झाली आणि ती ओळख प्रेमात रुपांतरित झाली आणि त्यांनी लग्नाऐवजी केवळ करार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला.


या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेने याला ‘लव्ह जिहाद’चे नवीन स्वरूप असल्याचा आरोप केला आहे. परिषदेकडून या प्रकाराचा निषेध करण्यात आला असून, अशा ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’द्वारे होणाऱ्या प्रकरणांवर पोलिसांनी आणि सामाजिक संघटनांनी लक्ष ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे ‘लिव्ह-इन अ‍ॅग्रीमेंट’सारख्या नव्या संकल्पनांवर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या

महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने?

या पध्दतीत खुल्या गटातील महापौराची शक्यता कमी मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण

श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात

गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळा मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात

माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा

मुंबई पालिकेच्या शैक्षणिक इतिहासात नवा टप्पा

सीबीएसईच्या पहिल्या १० वीच्या बॅचसाठी ३६६ विद्यार्थी तयार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात