"साराभाई व्हर्सेस साराभाई" च्या कलाकारांनी सतीश शाह यांना दिला भावूक निरोप, अंत्यसंस्कारावेळी गायले शोचे टायटल साँग


मुंबई: किडनीच्या आजारामुळे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांना निरोप देण्यासाठी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, त्यांच्या गाजलेल्या ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील कलाकारांनी त्यांना दिलेला निरोप पाहून चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.


मालिकेतील त्यांच्या सह-कलाकारांनी, म्हणजेच त्यांचे पडद्यावरील कुटुंब, रूपाली गांगुली , सुमित राघवन, राजेश कुमार, जे. डी. मजेठिया (निर्माता), आणि देवेन भोजानी यांनी एकत्र येत सतीश शाह यांच्या पार्थिवाजवळ उभे राहून मालिकेचे प्रसिद्ध टायटल साँग गायले.





नेहमी आनंदी आणि विनोदी स्वभावासाठी ओळखले जाणारे हे कलाकार यावेळी अत्यंत भावूक झाले होते. सतीश शाह यांच्या पार्थिवासमोर टायटल साँग गात असताना, 'मोनिशा साराभाई'ची भूमिका साकारणाऱ्या रूपाली गांगुलीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती खूप रडत होती, तेव्हा जे.डी. मजेठिया यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला.


 

'रोशेस साराभाई' साकारणारा राजेश कुमार आणि 'साहिल साराभाई' साकारणारा सुमित राघवन हे देखील यावेळी खूप दुःखी आणि शोकाकुल झालेले दिसले. या भावनिक निरोपाबद्दल बोलताना मालिकेचे दिग्दर्शक देवेन भोजानी यांनी सोशल मीडियावर सांगितले की, "आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा हे गाणे नक्की गातो, आणि आजचा दिवसही याला अपवाद नव्हता. आम्हाला असे वाटले, की 'इंदु' (सतीश शाह यांच्या पात्राचे नाव- Indravadan Sarabhai) स्वतःच आमच्यासोबत सामील झाले आहेत."


सतीश शाह यांनी 'इंदुवदन साराभाई' हे पात्र अनेक वर्षे आपल्या अभिनयाने जिवंत ठेवले होते. पडद्यावर धमाल करणारा हा परिवार खऱ्या आयुष्यातही किती जवळचा होता, हेच या भावनिक निरोपातून दिसून आले. एका महान कलाकाराला त्यांच्या 'कुटुंबाने' दिलेला हा निरोप पाहून चाहतेही खूप भावूक झाले.


सतीश शाह यांचे निधन २५ ऑक्टोबर रोजी किडनी निकामी झाल्यामुळे झाले. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले, पणसाराभाई व्हर्सेस साराभाईमधील त्यांची भूमिका अविस्मरणीय ठरली.


Comments
Add Comment

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

अरुण गवळींची दुसरी कन्याही राजकारणात

भायखळ्यातून महापालिका निवडणूक लढवणार सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सन

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे