मोहित सोमण:जागतिक अनुकुल परिस्थितीमुळे आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. ही वाढ अपेक्षितच होती. सकाळच्या गिफ्ट निफ्टीतील वाढीनंतर जागतिक तेजीचे आज मोघम संकेत मिळाले होते. सेन्सेक्स ४२३.१० अंकांने उसळत ८४६३४.३० पातळीवर निफ्टी ५० ७७.१५ अंकाने उसळत २५९२१.१० पातळीवर उघडला आहे. काल युएस चीन यांच्यातील डील अंतिम फेरीत यशस्वी पोहोचल्याने तसेच चीनमधील इंडस्ट्रीयल नफा २१.६% वाढल्याने आज आशियाई बाजारासह युएस बाजारातील तेजीत वाढ मिळण्याची शक्यता आहे. युएस बाजारातील टेक शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे जागतिक टेक क्षेत्रीय निर्देशांकात दिलासा मिळत असताना रशिया व भारत यांच्यातील संवाद प्रलंबित असताना युएस भारत एका व्यापारी निष्कर्षावर पोहो चले आहेत ज्याचा फायदा भारतीय शेअर बाजारात होताना दिसतो.
सकाळच्या सत्रात बँक निर्देशांकासह मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही तेजीचे संकेत मिळाले आहेत. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळी सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (१.१०%), रिअल्टी (१.४७%), पीएसयु बँक (१.१०%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (१.१६%) निर्देशांकात वाढ झाली आहे. युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीचे संकैत मिळत असताना एकूणच आज तेजीचा माहोल बाजारात कायम आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ स्मॉलकॅप ५० (०.८०%), मिडकॅप १०० (०.६०%), मिडकॅप ५० (०.६७%), निफ्टी १०० (०.५२%), निफ्टी २०० (०.५३%) समभागात झाली आहे. सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ५.७८% उसळला आहे.
२४ ऑक्टोबर रोजी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) ६२१.५१ कोटी रुपयांच्या समभागांचे निव्वळ विक्रेते होते, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) १७३.१३ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी करून निव्वळ खरेदीदार बनले. आशियाई निर्देशांकाची सुरूवात सकारात्मक झाली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा वाढ दर्शवत आहे. जपानचा निक्केई २२५ पहिल्यांदाच ५०००० पातळी ओलांडून १०२१.३५ अंकांनी किंवा २.०७% वाढून ५०३२१ पातळीवर पोहोचला. हाँगकाँगचा हँग सेंग ३०२.८५ अंकांनी किंवा १.१६% वाढला. चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक देखील ४१.०४ अंकांनी किंवा १.०४% वाढून हिरव्या रंगात सुरू झाला.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ आर आर केबल्स (५.१८%), इ क्लर्क सर्विसेस (५.०३%), कोफोर्ज (३.५९%), वेलस्पून लिविंग (३.४८%), शिंडलर (३.२८%), पुनावाला फायनान्स (३.१०%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (२.९८%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण झेन टेक्नॉलॉजी (४.९८%), सीईएससी (३.३२%), एसबीआय कार्ड (२.८६%), लेटंट व्ह्यू (२.६२%), डेटा पँटर्न (१.७४%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (१.३१%), रेनबो चाईल्ड (१.२७%), इन्फोसिस (१.२८%) समभागात झाली आ