सात लाख रोजगार निर्माण होणार : मंत्री सर्बानंद सोनोवाल

मुंबई : इंडिया मेरिटाईम ही जगातील सर्वात मोठी सागरी क्षेत्रातील परिषद असून या परिषदेला ८५ देशांतील प्रतिनिधी आले आहेत. या परिषदेत ६८० सामंजस्य करार होणार असून त्याद्वारे १० लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होईल, व त्याद्वारे ७ लाख रोजगार मिळतील, असा अंदाज केंद्रीय बंदरे व जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


ते पुढे म्हणाले कि २०४७ मध्ये विकसित भारत मध्ये मेरिटाईम क्षेत्राचे मोठे योगदान राहील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठी प्रगती केली. मेरीटाईम क्षेत्रात मोठे बदल झाले. सीफेअररच्या संख्येत वाढ झाली, देशातील बंदर क्षमता जवळपास दुप्पट झाली, कार्गो क्षमतेत वाढ झाली, असे ते म्हणाले. परिषदेत ४०० पेक्षा अधिक प्रदर्शक सहभागी झाले असून,नॉर्वे, नेदरलँड्स, डेन्मार्क आणि स्वीडन या ४ देशांची विशेष सत्रेही होणार आहे, याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, आसाम तसेच अंदमान आणि निकोबार यांचा समावेश असलेल्या ११ राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सत्रांचेही आयोजन केले जाणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाच्या मेरिटाईम क्षेत्रात मोठे बदल झाले असून जहाज बांधणी, दुरूस्ती व रिसायकल यासहित सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर भारत तयार झाला आहे. क्षमतांमध्ये मोठी वृद्धी झाली आहे. हा मेरिटाईम विकासाचा नवा कालखंड आहे, असे सोनोवाल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑक्टोबरला सहभागी होऊन देशवासीयांना, सागरी क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांना आणि इतर भागधारकांना संबोधित करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


महासागरांची एकजूट, समान सागरी दृष्टिकोन' या संकल्पनेवर आधारित इंडिया मेरिटाइम वीक २०२५ या कार्यक्रमात, भारताच्या सागरी धोरणाचा आणि अर्थव्यवस्थेमधील योगदानाचा आढावा घेतला जाईल आणि त्यातून भारत, जागतिक सागरी केंद्र आणि अर्थव्यवस्थेमध्ये आघाडीचा देश म्हणून कसा उदयास येऊ शकतो, हे दाखवले जाईल. ११ देशांचे मंत्री त्यांच्या उद्योग शिष्टमंडळांसह विविध सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. हा सहभाग भारताच्या सागरी क्षेत्रातील वाढत्या जागतिक स्वारस्याचे प्रतिक आहे, असे सोनोवाल म्हणाले. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो भारताला जागतिक सागरी केंद्र म्हणून स्थान देईल, हरित आणि शाश्वत सागरी वाहतुकीला प्रोत्साहन देईल आणि आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार तसेच संपर्क व्यवस्था वाढवेल, असे सोनोवाल यांनी स्पष्ट केले. देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे वातावरण तयार झाले आहे. सागरी क्षेत्र हे विकसित भारत निर्मितीतील महत्त्वाचा घटक ठरत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान

भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयासाठी आता विख्यात गायिका

एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि