प्रतिनिधी:आज २७ ऑक्टोबरला नऊ कंपन्यांच्या शेअरवर लाभांशासाठी कंपन्यांनी एक्स डेट जाहीर केली आहे. त्यामुळे या एक्स डेट पूर्वी शेअर खरेदी करण्याऱ्या लाभार्थी भागभांडवल गुंतवणूकदारांना लाभांश मिळू शकेल. म्हणजेच त्यानंतर शेअर खरेदी करणाऱ्या शेअरहोल्डरला त्याचा लाभ मिळणार नाही. जाणून घेऊयात कुठले आहेत हे शेअर
१) Central Bank of India - बँकेने ०.२० रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
२) CESC Limited - कंपनीने ६ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
३) ३६० One Wam Limited - कंपनीने ६ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
४) CRISIL Limited - कंपनीने १६ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे
५) Infosys Limited- कंपनीने २३ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
६) L & T Technology Limited - कंपनीने १८ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
७) PCBL Chemicals Limited - कंपनीने ६ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
८) REC Limited - कंपनीने ४.६ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
९) Tanla Platforms - कंपनीने ६ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
एक्स-डेट, किंवा एक्स-डिव्हिडंड डेट ही एक महत्त्वाची कटऑफ तारीख असते ज्या आधारे लाभांश (Dividend). मिळतो. या तारखेपूर्वी कंपनीचे शेअर्स असलेले गुंतवणूकदार घोषित लाभांश मिळविण्यास पात्र आहेत. तथापि, एक्स-डेटला किंवा त्यानंतर स्टॉक खरेदी करणाऱ्या कोणालाही पेआउट मिळणार नाही कारण त्याचा हक्क विक्रेत्याकडेच राहतो.स्टॉकसाठी एक्स-डिव्हिडंड तारीख सहसा रेकॉर्ड डेट किंवा जर रेकॉर्ड डेट व्यवसाय दिवस नसेल तर एक व्यवसाय दिवस आधी सेट केली जाते. जर तुम्ही स्टॉक त्याच्या एक्स-डिव्हिडंड तारखेला किंवा त्यानंतर खरेदी केला तर तुम्हाला पुढील लाभांश पेमेंट मिळणार नाही. त्याऐवजी, विक्रेत्याला लाभांश मिळतो.