मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर करण्याच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाकडून नेहमी विविध प्रकल्पांचे नियोजन करण्यात येते. त्यातील मरिना प्रकल्पाचे नियोजन प्राधिकरणाने अलीकडेच केले आहे. त्यासंबंधीच्या हालचालींना वेग आला असून खासगी बोटी उभ्या करण्याचा हा तळ भाऊचा धक्का किनारपट्टीपासून ५२३ मीटर आत समुद्रात असणार आहे. हे मरिना १४ हेक्टर एवढ्या परिसरात उभारण्यात येत असून याच्या बांधकामाचा खर्च ४७० कोटी रुपये आहे.



स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर मुंबई बंदर प्राधिकरण कार्यरत आहे. प्राधिकरणाने आता मुंबईच्या किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल सुरू केले असून, त्यासंबंधी अन्य उपक्रमही हाती घेतले आहेत. त्यातीलच मरिना हा महत्त्वाचा उपक्रम आहे. या मरिनाची उभारणी १०० टक्के खासगी विकासकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.




एकदा मरिनासाठीचे कंत्राटदार ठरल्यानंतर त्या ठिकाणी आलिशान हॉटेल, बँका, एटीएम केंद्र, मरिनावर आलेल्यांना मुंबईत नेण्यासाठीच्या कॅबचा तळ, बहुमजली वाहनतळ, बँक्वेट हॉल, क्लब हाउस, लॉन, व्यवसाय केंद्र, तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सुपर मार्केट, कन्व्हेन्शन केंद्र, बोटींच्या देखभाल व दुरुस्तीची केंद्रे, सीमा शुल्क तपासणी कार्यालय अशा अन्य प्रकारच्या सोयी-सुविधाही उभारल्या जाणार आहेत.



मरिना अंतर्गत एकूण ४२४ यॉट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय असेल. या बोटींची कमाल लांबी ३० मीटर किंवा त्याहून कमी असेल. मरिना ही संकल्पना प्रामुख्याने अमेरिका किंवा समुद्री क्षेत्रात पुढे असलेल्या नेदरलँड्स, डेन्मार्क या देशांमध्ये आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ भाजप नगरसेवकांनी पकडला गॅस सिलेंडर आणि गुटख्याचा अवैध साठा

महापौराने दिले कारवाईचे सक्त आदेश मुंबई ; लोकमान्य टिळक टर्मिनस (एल टी टी ) जवळील स्वराज चौकात शनिवारी २० जून २०२६

PM Kisan : राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब

ST bus : ४० वारकरी एकत्र आल्यास थेट गावातूनच सुटणार 'लालपरी'

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार ५०० विशेष बसेस; महिलांना ५० टक्के तर ज्येष्ठांना मोफत सेवा मुंबई :

Piyush Goyal : सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला मोदी सरकारच्या तपपूर्तीचा आढावा भारतीयांचे सामर्थ्य, समृद्धी,

Eknath Shinde : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायासाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निर्देशानंतर सीबीआय उच्च न्यायालयात करणार अपील मुंबई : पवनराजे निंबाळकर

Amit Shah : शिवसेना एकच, एकनाथ शिंदेंची!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; भारत देश धर्मशाळा नाही, घुसखोरांना हद्दपार करणारच मुंबई : "एकनाथ शिंदे यांच्या