अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे


अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तसेच २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिराच्या शिखरावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद ध्वजारोहण करतील. हा समारंभ भव्य प्राणप्रतिष्ठा समारंभासारखाच भव्य असेल आणि राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचेही प्रतीक असेल.


या कार्यक्रमासाठी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा मोठा मेळावा होणार आहे. जो पक्षाच्या नवीन मोहिमेचा शुभारंभ देखील असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान जगातील सर्वात मोठ्या स्काऊट गाईड टीमला देखील आमंत्रित करण्याची शक्यता आहे. यात ३५ हजारापेक्षा जास्त कॅडेड सहभागी घोण्याची शक्यता आहे.


श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांच्या मते, वाल्मिकी रामायणात दाखवल्याप्रमाणे सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाची चिन्हे असलेला भगवा ध्वज २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर असलेल्या ४२ फूट उंच स्तंभावर फडकवला जाईल. गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, पाच दिवसांचा हा सोहळा २१ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि २५ नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण समारंभाने संपेल.

Comments
Add Comment

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील