फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल ते खाल्ले जाते आणि रात्री जड जेवण घेतले जाते. अशा चुकीच्या सवयींमुळे शरीरात चरबी साठते, वजन वाढते आणि त्यातून अनेक आजार उद्भवतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी महागड्या जिममध्ये जातात, महागड्या डाएट प्लॅनचे पालन करतात, विविध उपाय आजमावतात पण वजन काही केल्या कमी होत नाही.


परंतु, यावरचा सोपा उपाय तुमच्या स्वतःच्या किचनमध्येच लपलेला आहे. जर तुम्ही रोज गव्हाची चपाती खात असाल, तर ती बदला. तिच्या ऐवजी ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खायला सुरुवात करा. हे दोन्ही पीठ शरीरासाठी पोषक असून, पचन सुधारते आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते.


ज्वारीची भाकरी - फिटनेस आणि एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणजे ज्वारी आहे. जे लोक जिममध्ये जातात आणि वर्कआऊट करुन मसल्स बनवू इच्छीत आहेत त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी वरदान ठरू शकते. ज्वारीत प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि स्नायूं कमजोर होण्यापासून वाचतात. ज्वारीत फायबर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे एक किंवा दोन भाकरी खाल्ल्यानंतर लगेच पोठ भरते. त्यामुळे अनेक तास तुम्हाला भूक लागत नाही.त्यामुळे विनाकारण काहीही खाण्याला लगाम लागतो. ज्वारी पचनासाठी चांगली असते. पोट फुगणे असा समस्यांपासून आपल्याला वाचवते. जर तुम्हाला वजन कमी करण्या सोबतच शरीराला फिट आणि एनर्जेटिक राखायचे असेल तर ज्वारी तुमच्यासाठी योग्य आहे.


नाचणीची भाकरी - नाचणीची भाकरी खाल्ल्याने तुम्ही बारीक होऊ शकता. आणि हाडे देखील मजबूत होतात. आयुर्वेदात नाचणीला पौष्टीक गुणांचा खजाना म्हटले आहे.ही केवळ वजन कमी करत नाही तर शरीराला आतून देखील मजबूत बनवते. नाचणीत दूधाहून अनेक पटीने कॅल्शियमचे प्रमाण जादा असते. नाचणीत ज्वारीपेक्षा जास्त फायबर असते. नाचणीची भाकरी खाल्ल्याने पोट असे भरते की तुम्हाला बराच काळ आणखी काही खाण्याची इच्छा होत नाही. ज्यामुळे कॅलरीचे इनटेक आपोआप कमी होते. वजन वेगाने कमी होते. तुम्ही जर केवळ बारीक न होता हाडांना देखील मजबूत करु इच्छीत असाल तर नाचणी तुमच्यासाठी महत्वाची आहे.


ज्वारी आणि नाचणी ही दोन्ही धान्ये चांगले पोषक आहेत. परंतू तुमचे लक्ष्य काय आहे ? जर वजन घटवणे आणि मसल्स टिकवून ठेवणे हे तुमचे लक्ष असेल तर ज्वारीच्या भाकरीची निवड करावी. जर लक्ष्य वजन घटवणे आणि हाडांना मजबूत करण्याचे असेल तर नाचणीची भाकरी तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. तर तुम्ही गव्हाच्या चपातीला काही काळ आराम द्यावा आणि हे दोन सुपरफूड भाकऱ्या ट्राय कराव्यात. काही आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवेल.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर