शरीरामध्ये युरिक अॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका संशोधनातील माहितीनुसार, जगभरातील जवळपास 56 दशलक्ष लोक युरिक अॅसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. या समस्येमुळे किडनी आणि शरीराच्या सांध्यांवर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात. त्यासाठी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एक पेय रोज उपाशी पोटी पेयल्यास युरिक ऍसिड कमी होत जाते.
युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात आणणारे पेय
युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात आणणारे पेय तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि किती प्रमाणात हे पेय प्यावे, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
सामग्री :
अर्धा चमचा हळद पावडर
हळदीमध्ये अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे सांधेदुखी आणि सांध्यावरील सूज कमी होण्यास मदत मिळते.
एक चमचा धणे
धण्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील युरिक अॅसिड बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. यामुळे किडनीची कार्यप्रणाली देखील सुधारते.
अर्धा चमचा जीरे
जिऱ्यातील पोषक घटकांमुळे पचनप्रक्रिया आणि किडनीची कार्यप्रणाली देखील सुधारते .
अर्धा चमचा मेथीच्या बिया
मेथीच्या बिया शरीरासाठी नॅचरल डिटॉक्सिफायरप्रमाणे काम करते, यामुळे यकृत आणि किडनीसारखे अवयव डिटॉक्स होण्यास मदत मिळते. मेथीच्या बिया रात्रभर भिजत ठेवा.
काळी मिरी
काळ्या मिरीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, ज्यामुळे सांधेदुखीची समस्या कमी होण्यासह संपूर्ण आरोग्यास लाभ मिळतात.
कृती :
१. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दोन कप पाणी घ्या.
२. गॅसच्या मध्यम आचेवर गरम करत ठेवा.
३. पाणी गरम होऊ लागल्यास त्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला.
४. एक चमचा धणे, अर्धा चमचा जीरे आणि भिजवलेल्या मेथीच्या बिया मिक्स करा.
५. थोड्या वेळाने गॅस बंद करा.
६. एका कपमध्ये पाणी गाळून घ्या.
७. तुम्हाला हवे असल्यास त्यामध्ये लिंबाचा रस आणि मधही मिक्स करू शकता.
पेय कधी प्यावे?
नियमित सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पिणे फायदेशीर ठरेल.
काही दिवसांतच तुम्हाला शरीरामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.