मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो प्रवासातील ही झोप महागात पडू शकते.
गाडीने प्रवास म्हटलं की डुलकी किंवा झोप आलीच. ऑफिससाठी दररोज प्रवास करणारे कितीतरी प्रवासी प्रवासात झोपतात. पण मेट्रोमध्ये अशी झोप काढणं तुम्हाला महागात पडू शकतं. अशी एक मेट्रो आहे ज्यात तुम्हाला झोपण्यास मनाई आहे.


चुकूनही तुम्ही झोपलात तर तुम्हाला दंड बसू शकतो. थोडाथोडका नव्हे तर हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो. मेट्रोमध्ये प्रवास करताना जमिनीवर बसणं, आडवं होणं, गेटसमोर उभं राहणं किंवा बसणं, सीटवर पाय वर करून बसणं, सीट झोपणं यास सक्त मनाई आहे.


हा नियम दुबई मेट्रोचा आहे. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका प्रवाशाच्या पोस्टनंतर, दुबई मेट्रोचे हे नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. दुबई मेट्रोच्या नियमांनुसार, प्रवास करताना जर तुम्ही जमिनीवर बसलात किंवा झोपलात तर तुम्हाला १०० ते ३०० दिरहमपर्यंत दंड होऊ शकतो. भारतीय रुपयात ही रक्कम सुमारे २,५०० ते ७,५०० रुपये आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात भारतीय नौदलाची दमदार उपस्थिती; आयएनएस सुदर्शिनी ठरले आकर्षण

वॉशिंग्टन डीसी : भारतीय नौदलाच्या आयएनएस सुदर्शिनी या जहाजाने अमेरिकेत भारताची शान उंचावली आहे. अमेरिका आपल्या

Venezuela Earthquake : ८ दिवस ढिगाऱ्याखाली अडकूनही मृत्यूवर मात; जिवंत बाहेर आला सुरक्षा रक्षक

व्हेनेझुएला : भूकंपामुळे (Earthquake) कोसळलेल्या नऊ मजली इमारतीच्या (Nine-storey Building) ढिगाऱ्याखाली तब्बल आठ दिवस अडकूनही एका

US Egg Price Scam : अंड्यांच्या किमतीत ७०% वाढ; अमेरिकेत ३ कंपन्यांवर कारवाई, ५.३ कोटी अंडी मोफत वाटावी लागणार

अमेरिका : अमेरिकेतील (America) कॅल-मेन फूड्स, वर्सोवा आणि हिकमन्स एग रँच या तीन प्रमुख अंडी उत्पादक कंपन्यांनी जून २०२२

POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी; रस्त्यावर उतरले हजारो नागरिक

मुझफ्फराबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Pakistan-Occupied Kashmir - PoK) सुरू असलेल्या पाकिस्तानविरोधी आंदोलनाने (Protest) मंगळवारी नवे

US Birthright Citizenship : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; जन्मसिद्ध नागरिकत्व कायम

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड