Tuesday, November 18, 2025

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक बोया किनाऱ्यावर आढळली. ही अनोळखी बोया पाहून नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत मेरीटाईमचे कर्मचारी नितेश तांबे यांनी तात्काळ पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर श्रीवर्धन पोलीस व मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन दखल घेतली. तसेच रायगड पोलिसांचे ब्रुनो हे श्वानपथक पाचरण करून तपास करण्यात आला.

मेरिटाईम बोर्डाचे निलेश तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार,रायगड मधील बागमांडला ते रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट दरम्यान खाडी पुलाच्या पिलरचे काम चालू आहे. यावेळी बाणकोट सागरी पोलीस ठाणे हद्दीत एक बार्ज बुडाली होती. ती बुडालेले बार्ज समुद्रातून वर खेचण्याकरिता ओहोटीच्या वेळेस बार्जला बोया बांधून ठेवण्यात आली होती. ज्यामुळे भरतीच्या वेळेला लाटांच्या आधाराने बार्ज तरंगत असताना बाहेर काढता येईल. यासाठी बोयाचा वापर केला होता. परंतु हवामान खराब असल्याने बोयाचा दोर तुटून ती समुद्रात भरकटून गेली. असे बुडालेल्या बार्जचे मालक अब्दुल रजाक अन्सारी यांनी सांगितले.

किनाऱ्यावर बोया आढळून आल्यावर श्रीवर्धन मेरिटाईम बोर्ड अधिकाऱ्यांनी बार्जचे मालक अब्दुल रजाक अन्सारी यांना संपर्क केला होता. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. ही बोया आता श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर आढळली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >