‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना आकर्षित केले आहे. जपानमधील ताशिरो-जिमा बेटाला जगभर ‘मांजरांचे बेट’ म्हणून ओळखले जाते. या छोट्या बेटावर मांजरींची संख्या तेथील मानवी वस्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

ताशिरो-जिमा हे बेट जपानच्या मियागी प्रांतातील इशिनोमाकी शहराच्या किनाऱ्याजवळ आहे. पूर्वी हे बेट रेशीम उत्पादनासाठी आणि मासेमारीसाठी प्रसिद्ध होते. येथे रेशीम किड्यांना त्रास देणाऱ्या उंदरांना नियंत्रित करण्यासाठी मांजरींना मोठ्या प्रमाणात आणले गेले. बेटावरील मच्छीमार मांजरींना शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानतात. मांजरी त्यांच्या मासेमारीच्या बोटींसाठी चांगले हवामान आणि भरपूर मासे आणतात, असा येथील लोकांचा विश्वास आहे. येथील लोक मांजरींची काळजी घेतात आणि त्यांना खायला देतात. त्यामुळे त्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

या बेटावर राहणाऱ्या माणसांची संख्या सुमारे १०० पेक्षा कमी आहे, तर मांजरींची संख्या ५०० हून अधिक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मांजरांच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी या बेटावर कुत्र्यांना आणण्यास सक्त मनाई आहे. या बेटावर मांजरीचे छोटे मंदिर देखील आहे, जिथे मासेमारी करताना अपघातात मरण पावलेल्या मांजरींसाठी प्रार्थना केली जाते. ताशिरो-जिमा बेटावरील शांत वातावरण आणि सर्वत्र मुक्तपणे फिरणाऱ्या मांजरी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. मांजरींबरोबर खेळणे आणि त्यांना खायला देणे, हा पर्यटकांसाठी एक वेगळा अनुभव असतो.
Comments
Add Comment

Cesar Gastelum : मेक्सिकोत प्रसिद्ध टिकटॉक इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलम यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या; जगभरात खळबळ

मेक्सिको : सोशल मीडियाच्या आभासी जगात आपल्या अनोख्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा एक

Donald Trump : थोडक्यात बचावले...! ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला; प्रवासी विमान अगदी जवळ आल्याने खळबळ

Donald Trump  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रवास करत असलेल्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरशी संबंधित गंभीर घटना समोर

Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही

Foreign Journalists in Pakistan : POK मधील सत्य लपवण्याचा प्रयत्न? पाकिस्तानने परदेशी पत्रकारांसाठी लागू केले नवे नियम

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मधील आंदोलनांवर करण्यात आलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावर