नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फूटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पूर्वी दिल्ली के लक्ष्मी नगर में एक ज्वेलरी शॉप में दो महिलाओं द्वारा सोने की अंगूठी चोरी का मामला सामने आया. धनतेरस के दिन हुई यह घटना दुकान के सीसीटीवी कैमरे में कैद हुई. #viralvideo #Delhi pic.twitter.com/3HfcAmo4NW
— NDTV India (@ndtvindia) October 25, 2025
ही घटना सणाच्या दिवशी घडली असून, सीसीटीव्हीमध्ये तीन महिला दुकानात येताना दिसतात. त्यापैकी दोन महिला काउंटरजवळ बसतात, तर तिसरी थोड्या अंतरावर थांबते. महिला कर्मचारी त्यांना अंगठ्यांचा बॉक्स दाखवते. कर्मचारी दुसरी अंगठी काढण्यासाठी वळताच, एका महिलेनं चतुराईने बॉक्समधून सोन्याची अंगठी उचलली आणि शेजारी बसलेल्या मुलीला दिली. त्या मुलीनं ती अंगठी आपल्या पर्समध्ये ठेवली. हे सर्व काही सेकंदात घडलं आणि कर्मचाऱ्याला याची काहीच कल्पनाही आली नाही.
काही वेळानंतर स्टॉक तपासताना दुकानातील कर्मचाऱ्यांना अंगठी गायब असल्याचे लक्षात आले. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. लक्ष्मी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरातील ज्वेलरी व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.