नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पकडले आहे. संबंधित महिलेने आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये ९९७.५ ग्रॅमची सोन्याची बिस्कीटे लपवली असून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिचा तस्करीचा डाव उधळून लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २४ ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली. ही महिला प्रवासी यांगून (म्यानमार) येथून दिल्लीला आली.
प्रवासादरम्यान महिला आपल्या मौल्यवान वस्तू बॅगमध्ये ठेवतात. मात्र दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलेल्या महिलेने आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये सोने लपवून ठेवले होते. ही महिला विमानतळावरील ग्रीन चॅनलमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती. ग्रीन चॅनेल अशा प्रवाशांसाठी असते ज्यांच्याकडे कोणतेही प्रतिबंधित किंवा करपात्र वस्तू नसतात. यावेळी अधिकाऱ्यांची नजर महिलेवर पडली आणि त्यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरू केली. त्यामुळे संपूर्ण विमानतळावर खळबळ माजली.
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची हत्या त्यांच्या स्वपत्नीने म्हणजे ...






