सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट


सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ० अशी जिंकली आहे. सिडनीतला सामना जिंकून भारत व्हाईटवॉश टाळतो की ऑस्ट्रेलिया मालिका ३ - ० अशी जिंकते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सुरुवात बरी केली पण नंतर भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचे तळाचे फलंदाज ढेपाळले. भारताने ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केले. कांगारुंनी ४६.४ षटकांत सर्वबाद २३६ धावा केल्या आणि भारतापुढे ५० षटकांत २३७ धावा करण्याचे आव्हान ठेवले.


ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ४१, हेडने २९, मॅथ्यू शॉर्टने ३०, रेनशॉने ५६, अ‍ॅलेक्स कॅरीने २४, कूपर कॉनोलीने २३, मिचेल ओवेनने १, मिचेल स्टार्कने २, नॅथन अॅलिसने १६, झम्पाने नाबाद २ आणि हेझवूडने शून्य धावांचे योगदान दिले. भारताकडून हर्षित राणाने चार, वॉशिंग्टन सुंदरने दोन तर अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.


धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १६ षटकांत एक बाद १०२ धावा केल्या आहेत. शुभमन गिल २४ धावा करुन हेझलवूडच्या चेंडूवर अलेक्स केरीकडे झेल देऊन परतला. रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत आहेत.


Comments
Add Comment

अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय

नवी दिल्ली  : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार

जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर

यूएईच्या कॅनडावरील थरारक विजयाने अफगाणिस्तानवर संकट!

नवी दिल्ली  : कॅनडा विरुद्ध युनायटेड अरब अमिराती यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ड गटातील सामना

टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान मॅचवर पावसाचे सावट

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

T20 WOrld Cup 2026 ZIM vs AUS: झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

श्रीलंका: आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये (T20 WOrld Cup 2026) झिम्बाब्वेने सर्वात मोठा उलटफेर करून ऑस्ट्रेलियाला २३