Saturday, October 25, 2025
Happy Diwali

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत ५०-५० च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत समसमान जागा वाटप व्हावं अशी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आहे.

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच ही माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची सदस्यसंख्या २२७ इतकी आहे. आता मुंबई महापालिकेत महायुती कशा प्रकारे जागा वाटप करणार याकडे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुकीत समसमान जागा वाटपासाठी आग्रह धरला जात आहे. महायुतीत समसमान जागा वाटप व्हावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याची माहिती आहे. ही माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आणि काँग्रेसमधून माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. तर, भाजपने ८२ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला ३१ जागांवर विजय मिळाला होता.

भाजप महायुतीत मोठा भाऊ

एकीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबई महापालिकेत समसमान जागा वाटपासाठी आग्रही असताना भाजप मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत १५० जागा लढवण्याची शक्यता आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ६५-७५ जागा दिल्या जाऊ शकतात, अशा चर्चा सुरु आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि रामदास आठवले यांच्या आरपीआय आठवले गटाला काही जागा दिल्या जाऊ शकतात, अशा चर्चा सुरु आहेत

महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढवणार

मुंबई महापालिकेत भाजप सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता आहे. भाजपकडून १५० जागा लढवल्या जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी भूमिका विजयाची खात्री असलेल्या जागा लढवण्याची आहे. मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत मुंबईत एका जागेवर विजय मिळवला होता. तर, भाजपला देखील एका जागेवर विजय मिळाला होता. तर, विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईत १५ जागा लढल्या होत्या आणि त्यांना ६ जागांवर विजय मिळाला होता.

Comments
Add Comment