अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे


अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तसेच २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिराच्या शिखरावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद ध्वजारोहण करतील. हा समारंभ भव्य प्राणप्रतिष्ठा समारंभासारखाच भव्य असेल आणि राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचेही प्रतीक असेल.


या कार्यक्रमासाठी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा मोठा मेळावा होणार आहे. जो पक्षाच्या नवीन मोहिमेचा शुभारंभ देखील असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान जगातील सर्वात मोठ्या स्काऊट गाईड टीमला देखील आमंत्रित करण्याची शक्यता आहे. यात ३५ हजारापेक्षा जास्त कॅडेड सहभागी घोण्याची शक्यता आहे.


श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांच्या मते, वाल्मिकी रामायणात दाखवल्याप्रमाणे सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाची चिन्हे असलेला भगवा ध्वज २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर असलेल्या ४२ फूट उंच स्तंभावर फडकवला जाईल. गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, पाच दिवसांचा हा सोहळा २१ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि २५ नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण समारंभाने संपेल.


ध्वज वादळही झेलू शकेल


अयोध्या आणि काशी येथील आचार्य विधी संपन्न करतील. राम मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज-स्तंभ ३६० अंश (degree) फिरणाऱ्या बॉल-बेअरिंगवर आधारित असेल. यामुळे हा ध्वज ६० किमी/तास वेगापर्यंतच्या जोरदार वाऱ्याचा सामना करू शकेल आणि वादळात त्याला कोणतेही नुकसान होणार नाही. ध्वजाच्या कपड्याची गुणवत्ता आणि वादळात त्याची सहनशक्ती याची तपासणी केली जात आहे. ध्वज तयार करणारी एजन्सी २८ ऑक्टोबर रोजी भवन निर्माण समितीच्या बैठकीत तपासणी अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारावर ध्वजासाठी अंतिम कपड्याची निवड केली जाईल.


ध्वजारोहण समारंभात १०,००० पाहुणे


राम मंदिर ट्रस्टने या कार्यक्रमासाठी पाहुण्यांची संख्या ८,००० वरून १०,००० पर्यंत वाढवली आहे. राम मंदिर संकुलातील इतर सहा मंदिरांमध्ये आणि शेषावतार मंदिरातही ध्वजारोहण होईल. ही भगवान शिव, गणेश, सूर्य, हनुमान, माता भगवती आणि माता अन्नपूर्णा यांची मंदिरे आहेत. राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा म्हणाले की, ध्वजारोहण समारंभात राम मंदिरासह आठही मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि हवन केले जाईल आणि इतर विधी देखील केले जातील.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी