कधी आहे कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि पूजा विधी

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पाला समर्पित असते. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दोन्ही दिवशी भाविक गणेशाची भक्तिभावाने पूजा करतात आणि उपवासही करतात. असे सांगतात की, या व्रताचे पालन करणाऱ्यांना गणपती बाप्पाचे आशीर्वाद लाभतात, अडथळे दूर होतात आणि जीवनात आनंद, सौभाग्य वाढते.



शुभ मुहूर्त :


पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २५ ऑक्टोबर रोजी पहाटे १:१९ वाजता सुरू होऊन २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:४८ वाजेपर्यंत राहील. त्यामुळे या वेळी विनायक चतुर्थी शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. सूर्योदय सकाळी ६:२८ ला तर सूर्यास्त संध्याकाळी ५:४२ वाजता होईल. चंद्रोदय सकाळी ९:५० वाजता आणि चंद्रास्त संध्याकाळी ७:५८ वाजता होईल. या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी ४:४६ ते ५:३७, विजया मुहूर्त दुपारी १:५७ ते २:४२, आणि गोधुली मुहूर्त संध्याकाळी ५:४२ ते ६:०७ या वेळेत राहील.



शुभ योग :


या विनायक चतुर्थीला शोभन योग आणि रवि योग तयार होत आहेत. तसेच रात्रभर भद्रा वास योग राहील. या दिवशी शिवकुटुंबाची पूजा केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते. या योगात गणपतीची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि यश लाभते, असे सांगतात.



पूजा विधी :


विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घर गंगाजलाने शुद्ध करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्थापन करावे. त्यानंतर फुले, दुर्वा, पंचामृत, खीर, फळे आणि काजू यांचा नैवेद्य अर्पण करून गणेश मंत्राचा जप करावा. शेवटी आरती करून दिवस उपवासात व्यतीत करावा. मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरीच विधिपूर्वक पूजा करावी. या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा केल्यास गणपती बाप्पा सर्व विघ्नांचा नाश करून भक्ताला समृद्धी, सौभाग्य आणि आनंद प्रदान करतो.

Comments
Add Comment

मुलांच्या आरोग्याशी खेळ?

विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी सांडपाणी दिल्याचा आरोप ठाणे : दिव्यातील मातोश्रीनगर परिसरातील एका खासगी शाळेत

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रांचे मुद्रांक शुल्क माफ

नागपूर : गेल्या वर्षी १६ ऑक्टोबरपासून मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. यानुसार, सर्व

क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार!

जिल्हा न्यायालयाकडून दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा नाशिक : राज्याचे क्रीडा मंत्री

पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप विश्वास यांचा राजीनामा

मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची घेतली जबाबदारी कोलकाता : अर्जेंटिनाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा घेतला बदला, कबड्डीपटू राणा बलाचौरियाची हत्या; बंबिहा गँगने घेतली जबाबदारी

मोहाली : पंजाबमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मोहाली जिल्ह्यातील सोहाना कस्ब्यात सुरू

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही