Stock Market Marathi News: सकाळच्या सत्रात शेअर बाजारात सकारात्मकता कायम मात्र बँक व एफएमसीजी शेअर घसरले काय सुरू आहे बाजारात जाणून घ्या....

मोहित सोमण:जागतिक बाजारपेठेतील व्यापारी संकटात सकारात्मक संकेत मिळत आहेत. याच शिथील झालेल्या अस्थिरतेत प्रस्तावित युएस चीनमधील पुढील आठवड्यात बोलणी होणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिल्यावर जागतिक शेअर बाजारात तेजीचे संकेत मिळत होते. त्यामुळे आज पहाटे गिफ्ट निफ्टीतील वाढीसह आज सकाळच्या सत्रात कलात शेअर बाजारात वाढ झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकातील सुरूवातीच्या कलात सेन्सेक्स ३२.७१ व निफ्टी १६.९० अंकांने वाढला आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात किरकोळ वाढ झाल्याने सपाट (Flat) पातळीवर गुंतवणूकदारांचा सावध कल स्पष्ट होत आहे. क्वालांलपूर येथील कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प व जींगपींग यांची भेट न झाल्याने विशेषतः चीन युएस यांच्यातील बोलणी पुढील आठवड्यात पुढे ढकलली गेली आहे. परिणामी सकारात्मकता कायम असली तरी अपेक्षित प्रतिसाद गुंतवणूकदारांनी सकाळच्या सत्रात दिलेला नाही.


दिवाळीतील झालेल्या वाढत्या विक्रीसह जीएसटी दरकपातीचा फायदा निश्चितच गुंतवणूकदारांना होत असताना भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना निश्चितता प्राप्त झालेली नाही. सुरूवातीच्या कलात बँक निर्देशांकात घसरण कायम राहिली अ सून मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे आज बाजारात सपोर्ट लेवल मिळाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ रिअल्टी (०.७२%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (०.४९%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.३०%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.२२%) निर्देशांकात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण एफएमसीजी (१.१८%), फार्मा (०.३४%), खाजगी बँक (०.३४%), हेल्थकेअर (०.२९%) निर्देशांकात झाली आहे. व्यापक निर्देशांकातील मिडकॅप १०० (०.४४%),स्मॉल कॅप १०० (०.२०%), मिडकॅप ५० (०.४४%), मिड स्मॉल कॅप ४०० (०.३३%) निर्देशांकात वाढ झाली.


आज सकाळच्या सत्रात जागतिक स्तरावर प्रतिसाद सकारात्मकतेत झुकलेला जाणवतो. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात सगळ्याच निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ निकेयी २२५ (१.५९%), कोसपी (२.१९%), शांघाई कंपोझिट (०.४२%), सेट कंपोझिट (०.९१%) निर्देशांकात झाली आहे. युएस चीन प्रस्तावित डीलनंतर युएस मधील तीनही शेअर बाजारात वाढ झाली आहे ज्यात डाऊ जोन्स (०.११%), एस अँड पी ५०० (०.५८%), नासडाक (०.८९%) समावेश आहे.


२३ ऑक्टोबर रोजी परदेशी गुंतवणूकदारांनी (FPI/FII) ११६६ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली असे तात्पुरत्या प्रोविजनल आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) बाजाराला पाठिंबा देत ३८९४ को टी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ खरेदी केली. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात तेलाच्या किमती घसरल्या. डब्ल्यूटीआय क्रूड ०.३७% घसरून प्रति बॅरल $६१.५६ वर आला, तर ब्रेंट क्रूड देखील ०.३७% घसरून प्रति बॅरल $६५.७४ वर आला.भारतीय परिपेक्षात ब घितल्यास वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी सांगितले की प्रस्तावित व्यापार करारावर भारत आणि अमेरिका यांच्यातील चर्चा स्थिर प्रगती करत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की दोन्ही बाजू लवकरच संतुलित आणि निष्पक्ष करार साध्य करण्यासाठी काम करत आहेत. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतातील एक शिष्टमंडळ गेल्या आठवड्यात तीन दिवसांच्या व्यापार चर्चेसाठी वॉशिंग्टनला भेट दिली ती १७ ऑक्टोबर रोजी संपली होती.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ हिंदाल्को इंडस्ट्रीज (३.९५%), सम्मान कॅपिटल (३.४१%), जी ई व्हर्नोव्हा (३.१७%), चोला फायनांशियल (२.५८%), वेदांता (२.३८%), हिंदुस्थान कॉपर (२.३०%), भारत डायनामिक्स (२.२२%), इन्फोऐज इंडिया (१.९३%), सीपीसीएल (१.९२%), ग्राविटा इंडिया (१.८३%), हिंदुस्थान झिंक (१.७७%), सोनाटा सॉफ्टवेअर (१.७४%), ब्लू स्टार (१.३८%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (१.५७%), मुथुट फायनान्स (१.३७%) समभागात झाली आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण हिंदुस्थान युनिलिव्हर (३.६३%), वर्धमान टेक्सटाईल (३.२९%), सिप्ला (३.१०%), कोलगेट पामोलीव (३%), लारुस लॅब्स (२.५२%), डाबर इंडिया (१.६७%), कोटक महिंद्रा बँक (१.६४%), मारिको (१.३९%), केपीआर मिल्स (१.३९%), एबी रिअल इस्टेट (१.३१%), युनायटेड ब्रेवरीज (१.३५%), वोडाफोन आयडिया (१.१६%), गोदरेज कंज्यूमर (१.०५%), मेट्रोपॉलिस हेल्थ (१.०५%), टोरंट पॉवर (१.०४%), केफीन टेक्नॉलॉजी (१.०४%), न्यूजेन सॉफ्टवेअर (०.९८%), टाटा कंज्यूमर (०.९४%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.