षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने ७३ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याने आपला फॉर्म परत मिळवल्याचे संकेत दिले. याचसोबत, रोहित शर्मा आता क्रिकेट जगतातील एका विश्वविक्रमाच्या अगदी उंबरठ्यावर उभा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत २७५ एकदिवसीय सामन्यांत ३४६ षटकार मारले आहेत आणि तो सध्या या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. आफ्रिदीचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला फक्त ६ षटकारांची गरज आहे.


एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम सध्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने आपल्या ३९८ सामन्यांच्या कारकिर्दीत ३५१ षटकार मारले आहेत. तो जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने ३५० पेक्षा जास्त षटकार मारले आहेत. आफ्रिदी २०१५ मध्ये निवृत्त झाल्यापासून हा विक्रम अबाधित आहे. मात्र आता रोहितने आणखी चार षटकार मारल्यास, तो ३५० षटकार पूर्ण करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरेल. पाच षटकार मारल्यास, तो आफ्रिदीच्या ३५१ षटकारांच्या विक्रमाची बरोबरी करेलआणि सहावा षटकार मारताच, तो आफ्रिदीला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातला नंबर एक फलंदाज बनेल.



ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ९७ चेंडूत ७३ धावांची खेळी करताना दोन उत्तुंग षटकार मारले. पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बाकी आहे. क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे की, रोहित शर्मा तिसऱ्या वनडेमध्ये मोठी आणि स्फोटक खेळी करेल आणि सोबतच शाहिद आफ्रिदीचा सुमारे १० वर्षांपूर्वीचा हा मोठा विश्वविक्रम मोडून नवा इतिहास रचेल.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत