संगीतकार सचिन संघवीला अटक: तरुणीवर अत्याचार आणि गर्भपाताचे आरोप

मुंबई : बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या गायक आणि संगीतकार सचिन संघवी याच्याविरुद्ध एका २९ वर्षांच्या तरुणीने विलेपार्ले पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे सचिनला अटक झाली होती, पण नंतर त्याला जामीन मिळाला आहे.


पोलिसांनी सचिनवर फसवणूक, अत्याचार आणि महिलेची संमती नसताना गर्भपात केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. आता हे प्रकरण पुढील तपासासाठी सांताक्रूझ पोलिसांकडे देण्यात आले आहे.


एफआयआरमध्ये सांगितल्यानुसार, विलेपार्ले पूर्व येथे राहणारी ही तरुणी गायिका आहे. तिची आणि सचिनची ओळख फेब्रुवारी २०२४ मध्ये इंस्टाग्रामवर झाली होती. सचिनने तिच्या आवाजाचे कौतुक करून तिला आपल्या अल्बममध्ये काम करण्याची ऑफर दिली. कामाच्या निमित्ताने ते एकमेकांना भेटू लागले.


तरुणीने आरोप केला आहे की, सचिन तिला त्याच्या सांताक्रूझ येथील स्टुडिओमध्ये बोलावून भेटायचा आणि तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करेल, असे खोटे आश्वासन त्याने दिले. तो नेहमी सांगायचा की, त्याचे वैवाहिक जीवन चांगले नाही.


पीडितेच्या आरोपानुसार, एप्रिल २०२४ मध्ये सांताक्रूझच्या एका स्टुडिओमध्ये त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मे आणि जून २०२४ मध्ये त्याने त्याच्या घरी आणि परदेशात बुडापेस्ट येथेही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.


२९ जुलै २०२५ रोजी, तरुणीला सचिनच्या फोनमध्ये दुसऱ्या महिलेसोबतचे फोटो आणि चॅट्स दिसले, तेव्हा त्यांच्यात मोठे भांडण झाले. यानंतर दुबईत असताना त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.


४ ऑगस्ट २०२५ रोजी तिला कळले की ती गरोदर आहे. तेव्हा सचिन तिला भेटला आणि त्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी देऊन गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. भीतीमुळे तिने गर्भपात केला. त्यानंतर सचिनने तिच्याशी पूर्णपणे संबंध तोडले. या धक्क्याने ती खूप नैराश्यात गेली होती. अखेर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

अजित पवारांवर आली नामुष्की, स्वप्न अपूर्णच राहिले

पाटणा : आधी राष्ट्रीय पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या नेतृत्वात भाजपचा प्रभाव वाढल्यामुळे

बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय, भाजप सर्वात मोठा पक्ष

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला. भारतीय जनता पार्टी (BJP) बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष

“२५ वर्षे मुंबई महापालिका लुटली” अमित साटमांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष वार

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला असून आता पक्षाने थेट

Gold Silver Rate: सोन्यात मोठी घसरण पण चांदीत किरकोळ वाढ! जागतिक कमोडिटीवर व्याजदर कपातीचा संभ्रम भारी? जाणून घ्या सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण: आज जागतिक अस्थिरतेच्या काळात किरकोळ दिलासा मिळाल्याने आज सोन्यात मोठी घसरण झाली असून चांदीत मात्र

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीचं कारण जगजाहीर...

मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट