मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा कचरा यामुळे मुंबईतील दैनंदिन कचऱ्यात वाढ झाली आहे. या सणाच्या काळात तब्बल ३ हजार टन अतिरिक्त कचरा निर्माण झाला आहे.


सणासुदीच्या काळात शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या मोठ्या वाढीचा मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) प्रभावीपणे सामना करत शहरात कचऱ्याचा वेळेत व सुरळीत साफसफाई करत शहर आणि उपनगराचा परिसर स्वच्छ राखण्याचा प्रयत्न केला.


गेल्या काही दिवसांत शहरात नेहमीपेक्षा सुमारे ३,००० मेट्रिक टन अतिरिक्त कचरा निर्माण झाला असून त्यापैकी २,०७५ मेट्रिक टन कचरा कांजूर व देवोनार डेपो येथे निपटारा करण्यात आला आहे, तसेच सुमारे १,००० मेट्रिक टन कचरा ट्रान्स्फर स्टेशनवरून उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


सप्टेंबर २०२५ पर्यंत दररोज सरासरी कचरा निपटारा ६,९०० टन इतका होता, तर गेल्या काही दिवसांत तो वाढून ७,३०० टन प्रतिदिन इतका झाला आहे. सणांच्या काळात ही वाढ सरासरी ६००–७०० टन प्रतिदिन इतकी झाली असून, बीएमसीच्या सज्जतेमुळे ही वाढ प्रभावीपणे हाताळण्यात आली आहे.सणासुदीच्या काळात शहरातील सर्व वॉर्डांमध्ये सफाई पथकांनी अतिरिक्त शिफ्टमध्ये काम करून रस्त्यांवरील व संकलन केंद्रांवरील कचरा त्वरित उचलला जात आहे


“सणासुदीच्या काळात अवघ्या काही दिवसांत ३,००० टनांहून अधिक कचरा निर्माण झाला. बीएमसीच्या सर्व पथकांनी दिवस-रात्र काम करून हा अतिरिक्त कचरा वेळेत हाताळला. वेळेत केली गेलेली ही साफसफाई आमच्या सज्जतेचे आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे तथा कार्यतत्परतेच प्रतिक आहे.” - किरण दिघावकर, उपयुक्त (घनकचरा व्यवस्थापन)




 
Comments
Add Comment

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन