महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय! ५३ धावांनी भारताने गाठले उपांत्य फेरीत स्थान

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी आपली जागा निश्चित केली आहे. विश्वचषकाच्या २४व्या आणि महत्त्वाच्या सामन्यात भारत विरूद्ध न्यूझीलंड असा सामना झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे उपांत्य फेरीतील उर्वरीत एका जागेवर भारताने आपले नाव लिहीले आहे. मात्र भारताचा बांग्लादेशसोबतचा एक सामना बाकी आहे. ज्यामुळे गुणतालिकेत बदल होऊ शकतो.


उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९ षटकात ३ गडी गमवून ३४० धावा केल्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे षटकं कमी करण्यात आली. डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडसमोर ४४ षटकात ३२५ धावांचे सुधारित आव्हान ठेवण्यात आले. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने शेवटपर्यंत झुंज दिली. न्यूझीलंडच्या संघाने ८ विकेट गमवून २७१ धावा केल्या. त्यामुळे भारत हा सामना ५३ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. पण भारताचा उपांत्य फेरीपूर्वीचा अजून एक सामना बाकी आहे.


भारताची उपांत्य फेरीतील जागा निश्चित झाली आहे. पण अजूनही न्यूझीलंड आणि श्रीलंकेकडे संधी आहे. न्यूझीलंडचा शेवटचा सामना इंग्लंडशी तर श्रीलंकेचा शेवटचा सामना पाकिस्तानशी आणि भारताचा शेवटचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. भारत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाला तर या दोन संघांना उपांत्य फेरीसाठी संधी मिळू शकते. शेवटचा सामन्यात जर हे तीनही संघ जिंकले तर भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे प्रत्येकी ६ गुण होतील. पण नेट रनरेटच्या आधारावर चौथा संघ भारतच असू शकतो हे निश्चित आहे. त्यामुळे भारताने सामना गमावला तरी नेट रनरेटच्या आधारावर तिकीट मिळेल. पण भारताने बांगलादेशला शेवटच्या सामन्यात पराभूत केलं तर प्रश्नच उरणार नाही.

Comments
Add Comment

'इडन गार्डन्स' वर आजपासून द.आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी !

पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निश्चित ; शुभमनने दिले संकेत मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

हार्दिक पंड्या लवकरच मैदानात; टीम इंडियात पुनरागमनाआधी खेळणार बडोद्यासाठी

मुंबई : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आशिया कप 2025

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ साठी १२ संघ खेळणार

कसोटी क्रिकेट दोन भागांत विभागले जाणार नाही नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ मधील सामने सध्या

राग, निराशा अन् हतबलता वाढतेय!

इंडियन सुपर लीग सुरू करण्यासाठी फुटबॉलपटूंची विनंती नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५