मुंबईतील स्ट्रीट फर्निचरच्या कंत्राट कामांना बोनस, आणखी वाढवून दिली एवढ्या कोटींची रक्कम

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या प्रशासकांच्या काळात मंजूर झालेल्या वादग्रस्त स्ट्रीट फर्निचरची कामे सुरु असली तरी आता याच कंत्राटदाराला वाढीव ५४ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. स्ट्रीट फर्निचरसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारामार्फत रस्ता आणि पदपथ यावर रेलिंग लावण्यात येत असून नव्याने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर जी. एफ.आर.सी. रेलिंग बसवण्यात येणार आहे. ही कामे नव्याने कंत्राटदाराची निवड करून देण्याऐवजी विद्यमान स्ट्रीट फर्निचरकरता नेमलेल्या कंत्राटदाराकडून हे काम करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी स्ट्रीट फर्निचरच्या कामासाठी मंजूर केलेल्या सुमारे ३६० कोटी रुपयांऐवजी कंत्राट रक्कम आता ४१४.५५ कोटी रुपयांवर जावून पोहोचली आहे.


मुंबई शहराच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने अनेक कामे हाती घेतली होती. मुंबईतील पदपथांवर सौदर्यीकरणात भर पडावी आणि सुरक्षित पदपथ असावे याकरता स्ट्रीट फर्निचरसाठी निविदा काढून फेब्रुवारी २०२३ रोजी कंत्राटदार निवडीला मंजुरी दिली होती. या निविदेमध्ये तीन वर्षांच्या कलावधीकरता विविध करांसह ३६० कोटी रुपयांच्या या कामांसाठी शांतीनाथ रोडवेज या कंपनीची निवड करण्यात आली होती. या कामांना एप्रिल २०२३ पासून सुरुवात झाली आहे. या कंत्राटात स्ट्रीट फर्निचरमध्ये मंजूर झालेल्या पीगमेंटेड काँक्रिट फिनीश्ड या बाबी वगळून केवळ उर्वरीत ग्लास फायबर अंतर्गत रेलींग्ज व बोलार्ड बसवण्याची कामे हाती घेण्यात आली आहे.


मुंबईतील पहिला टप्पा व दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट कॉक्रीट निविदेमध्ये एम. एस.रेलिंग बसवण्याचे प्रस्तावित केले होते पण एम.एस. रेलिंगचा हमी कालावधी ३ वर्षाचा आहे तर जीएफआरसी रेलिंगचा हमी कालावधी १० वर्षांचा आहे. धातुच्या उच्च भंगारमूल्यामुळे एम.एस. रेलिंग अनेकदा चोरीला जातात तथा तुटतात तर जीएफआरसी रेलिंगचे भंगारमूल्य शून्य असते. त्यामुळे ती चोरीला जात नाहीत. मुंबई शहराच्या दमट हवामानामुळे एम.एस. रेलिंग सहजपणे गंजतात तर जीएफआरसी रेलिंग गंजत नाहीत.


मुंबईत पहिला टप्पा, दुसऱ्या टप्यातील सिमेंट काँक्रीट निविदेमध्ये एम. एस. रेलिंग प्रस्तावित करण्यात आले. पण आता एम. एस. रेलिंगचा वापर न करण्याचा निर्णय रस्ते विभागाने घेत याबाबतचे परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे हे वाढीव काम चालू असलेल्या स्ट्रीट फर्निचर कंत्राटाच्या विद्यमान कंत्राटदाराकडून म्हणजेच शांतीनाथ रोडवेज यांच्यामार्फत करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्ट्रीट फर्निचरच्या कंत्राट कामातून मंजूर ६ बाबी रद्द करण्यात आल्याने त्या बदल्यात ही वाढीव कामे करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात