‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून अक्षया कायम चर्चेत असते. नुकतंच अक्षयाचं दमदार ओटीटी पदार्पण झालं असून टेलिव्हिजन पासून सुरू झालेला तिचा प्रवास नेटफ्लिक्स डेब्यूपर्यंत येऊन पोहचला आहे.
नेटफ्लिक्स या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला ‘ग्रेटर कलेश’ या सिनेमातून अक्षयाने ओटीटीवर पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने एक खास भूमिका केली असून ती खूप लक्षवेधी ठरतेय. प्रत्येक कुटुंबात घडणाऱ्या फॅमिली ड्रामाचं उत्तम उदाहरण असलेल्या या खास चित्रपटात तिने दमदार काम केलं आहे. अक्षया ने या चित्रपटात ‘पंखुरी’ हे पात्र साकारले असून ग्रेटर कलेश हा सिनेमा जगभरात नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड होताना दिसतोय. कोणत्याही कलाकाराची बॉलिवूडमध्ये एकदा तरी काम करण्याची इच्छा असतेच आणि या निमित्ताने अक्षया या खास प्रोजेक्टचा भाग झाली आणि तिची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली.
मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार विभागाने मोठे पाऊल उचलले ...
पहिल्या वहिल्या ओटीटी डेब्यूबद्दल बोलताना अक्षया सांगते, ‘माझी नेहमीच एक पाऊल पुढे टाकायची इच्छा असते आणि माझ्यासाठी कुठलंच काम छोटं नसतं. पण नेहमी नवीन काहीतरी करण्याची इच्छा असल्याने हा प्रोजेक्ट करण्याची मला संधी आली असं मला वाटतं. कुठल्याही कलाकारासाठी नेटफ्लिक्स हा प्लेटफॉर्म खूप मोठा आहे. माझा पहिला बॉलिवूड फिल्म डेब्यू इकडे होईल याची कल्पना नव्हती. एवढ्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपट करायला मिळणं ही संधी खूप खास होती, याचा तर आनंद आहे आणि अर्थातच आमची फिल्म सध्या नंबर 1 वर ट्रेंड करत असल्यामुळे स्वतःलाच एक मस्त दिवाळी गिफ्ट मिळालं याचा आनंद वाटतोय.
अभिनयाची चुणूक दाखवून आज अक्षयाचा बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीमधला प्रवास जोरदार सुरू झाला आहे. येणाऱ्या काळात बॉलिवूडसोबत ती काही मराठी प्रोजेक्ट्समध्येही दिसणार आहे.