BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या सेवेनंतर महिला हवालदाराला बढती

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या सेवेनंतर महिला हवालदाराला (लेडी कॉन्स्टेबल) बढती मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधील दादरी येथील रहिवासी शिवानी ही एका सुताराची मुलगी असून ती नियुक्तीनंतर एवढ्या कमी कालावधीत बढती मिळवणारी पहिली कॉन्स्टेबल आहे.


शिवानीला ब्राझीलमध्ये झालेल्या १७व्या जागतिक वुशू चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल हेड कॉन्स्टेबल पदावर बढती देण्यात आली. ही बढती बीएसएफचे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्यांनी सांगितले की, गृह मंत्रालय आणि डीओपीटीने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वेळेआधी पदोन्नतीची तरतूद आहे.


याआधी जुलै २०२५ मध्ये कॉन्स्टेबल अनुज यांनाही चीनमध्ये झालेल्या सांडा वर्ल्ड कपमधील रौप्य पदकासाठी अशीच बढती मिळाली होती.


शिवानी सध्या पंजाबमधील १५५ व्या बटालियनमध्ये कार्यरत आहे. ती दररोज किमान चार तास वुशूचा सराव करते. तिचे पुढचे लक्ष्य वर्ल्ड कपचं सुवर्णपदक आहे.


सीमा सुरक्षा दलाने खेळाडूंना प्रोत्साहन देणारे धोरण तयार केले आहे. या अंतर्गत खेळाडूंना योग्य आहार, उपकरणे, प्रशिक्षक आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. शिवानीच्या यशाने केवळ तिचं नाही, तर संपूर्ण दलाचं मनोबल वाढल्याचे बीएसएफचे महासंचालक दलजित सिंग चौधरी म्हणाले. फक्त पाच महिन्यांत पदोन्नती मिळवणारी शिवानी ही केवळ बीएसएफसाठीच नव्हे तर देशातील सर्व केंद्रीय सशस्त्र दलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Comments
Add Comment

हार्दिक पंड्या लवकरच मैदानात; टीम इंडियात पुनरागमनाआधी खेळणार बडोद्यासाठी

मुंबई : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आशिया कप 2025

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ साठी १२ संघ खेळणार

कसोटी क्रिकेट दोन भागांत विभागले जाणार नाही नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ मधील सामने सध्या

राग, निराशा अन् हतबलता वाढतेय!

इंडियन सुपर लीग सुरू करण्यासाठी फुटबॉलपटूंची विनंती नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत

एअर पिस्तूल स्पर्धेत भारताला अजिंक्यपद! २० वर्षीय नेमबाज राणा झाला 'सम्राट'

इजिप्त: कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल गटात एकूण २४३.७ गुणांसह युवा