नवी दिल्ली: भाऊबीज हा दिवाळीतील महत्वाचा दिवस असतो. याच दिवाळी सारख्या महत्वाच्या उत्सवातील उलाढालीत एकट्या दिल्लीने सुमारे २८०० कोटी रुपयांचे योगदान दिले असल्याचे एका अहवालात स्पष्ट केले गेले आहे. लोकांनी भेटवस्तू, मिठाई आणि पारंपारिक विधींसह भाऊ-बहिणींम धील विशेष नाते साजरे केले ज्यामुळे वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते आहे. गुरुवारी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) कडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, भाऊबीज सणाने संपूर्ण भारतात उत्सवाचा उत्साह आणि मजबूत व्यवसायाला चालना दिली ज्यामुळे अंदाजे २२००० कोटी रुपयांचा व्यापार झाला आहे.
सीएआयटी (CAIT) नुसार, ज्या प्रमुख श्रेणींमध्ये जास्त मागणी होती त्यात मिठाई आणि सुकामेवा, कपडे आणि साड्या, दागिने आणि अँक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स, गृह उपकरणे आणि गिफ्ट हॅम्पर्स यांचा समावेश होता. प्रवास, कॅब सेवा, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स मध्येही व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये (Acitivity) वाढ झाली आहे. याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना, चांदणी चौक येथील खासदार आणि CAIT चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की भाऊबीज केवळ कौटुंबिक संबंध मजबूत करत नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.'
सणातील महत्वाचा दिवस भाऊबीज हासण भावंडांमधील प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक असलेला म्हणून मानला जातो. गुरुवारी संपूर्ण भारतात सणाचा जल्लोष हा देशस्तरीय पातळीवरील शहरे, गावे आणि गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आ हे. भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्यापासून ते कौटुंबिक मेळाव्यापर्यंत आणि उत्सवी मेजवान्यांपर्यंत हा दिवस आनंद आणि एकतेने भरलेला होता ज्याचे प्रतिबिंब बाजारपेठेतही उमटले होते.दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, लखनौ, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, पुणे आणि इंदूरसह प्रमुख शहरांमधील बाजारपेठांमध्ये मिठाई, भेटवस्तू, कपडे, दागिने आणि उत्सवाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी खरेदीदारांची गर्दी झाली होती.
'भाऊबीज हा केवळ कौटुंबिक सण नाही तर तो भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे जो कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेम, त्याग आणि आदराची भावना बळकट करतो' असे खंडेलवाल म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, या वर्षीच्या उत्सवांनी सरकारच्या ‘व्होकल फॉर लोक ल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांनाही पाठिंबा दिला, कारण व्यापाऱ्यांनी स्वदेशी उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन दिले.
सीएआयटीने अहवालातील निरीक्षणानुसार, स्वदेशी वस्तूंच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ५०% वाढ झाली आहे. पारंपारिक मिठाई, हस्तनिर्मित भेटवस्तू, सुकामेवा आणि हातमागाच्या कपड्यांना मोठी मागणी आहे. व्यापक आर्थिक परिणामांवर प्र काश टाकताना, खंडेलवाल यांनी नमूद केले की असे उत्सव भारताच्या बिगर-कॉर्पोरेट आणि बिगर-कृषी क्षेत्राच्या लवचिकतेचे प्रदर्शन करतात, जे देशाच्या विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. CAIT चा असा विश्वास आहे की भाऊबीजसारखे प्रसंग केवळ सामाजिक सौहार्द वाढवत नाहीत तर ग्राहकांना स्वदेशी उत्पादने निवडण्यास प्रेरित करून भारताच्या पारंपारिक बाजार संस्कृतीला पुनरुज्जीवित करतात, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत स्वावलंबनाची भावना बळकट होते.