भाऊबीजनिमित्त राज-उद्धव पुन्हा एकत्र

मुंबई : आज देशभरात भाऊबीज उत्साहात साजरी होत असतानाच आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी आज (दि.२३) शिवतीर्थ येथे बहीण उर्वशीसोबत भाऊबीज साजरी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही त्यांची बहीण जयजयवंती यांच्या घरी भाऊबीज साजरी करण्यासाठी दाखल झाले होते. अलीकडच्या काही दिवसांत ठाकरे बंधूंच्या भेटी वारंवार होत असल्याने, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे बुधवारी राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे गेले होते. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्या. आज, गुरुवारी पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांना उर्वशी ठाकरे ही एकमेव बहीण आहे. मागील काही महिन्यांपासून ठाकरे कुटुंबीयांची जवळीक वाढल्यामुळे यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थावर साजरी होणार असून, सर्वांचे लक्ष या विशेष भेटीकडे लागले आहे.तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या घरी दुपारी दाखल झाले असून, तिथे दोन्ही ठाकरे बंधू बहीण जयजयवंती यांच्यासोबत भाऊबीज साजरी करणार आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गेल्या काही महिन्यांत झालेल्या भेटींची संख्या आता आठवर पोहोचली आहे. या भेटी कौटुंबिक स्नेहबंधांमुळे होत असल्या तरी, प्रत्येक भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगते. दोन्ही ठाकरे बंधूंनी अद्याप राजकीय युतीची कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नसली, तरी त्यांच्या सलग भेटींमुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये 'ठाकरे पुन्हा एकत्र येणार का?' या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे, भाऊबीजेच्या निमित्ताने ही त्यांची नववी भेट होते का आणि या भेटीतून काही नवे राजकीय संकेत मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील