मुंबई : येत्या २५ ऑक्टोबरला जिओ हॉटस्टारवर आणि २६ ऑक्टोबरला स्टार प्लसवर AI महाभारत प्रसारित होणार आहे. AI महाभारतासाठी अमिताभ बच्चनने खास शुभेच्छा दिल्या आहेत. AI चे हे नवीन व्हर्जन निश्चितच सर्वांना आवडणार आहे. AI महाभारताचा ट्रेलर सर्व दिग्गज कलाकारांनी त्यांच्या ऑफिशिअल सोशल अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा ट्रेलर बघून प्रेक्षकांच्या मनात वेगळीच उत्सुकता बघायला मिळत आहे.
महाभारत म्हणजे भारतातील महान महाकाव्य आहे. असे हे महाकाव्य आता AI व्हर्जन मध्ये दिसणार आहे. टेक्नॉलॉजी आणि दिग्दर्शन यांचा सगळ्यात मोठा वाटा यात आहे. नवीन पिढीसाठी हे आव्हान आहे. या मालिकेत १०० एपिसोड आहेत. जे पांडव आणि कौरव यांच्यावर आधारित आहेत. त्याचबरोबर आयुष्य कसे जगावे यावर भाष्य केले जाईल. मालिकेत प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विचारांचा संगम बघायला मिळेल.