ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेड ODI जिंकली


अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेडचा एकदिवसीय सामना जिंकून मालिका २ - ० अशी खिशात टाकली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनीत होणार आहे. पण मालिकेचा निर्णय आधीच लागल्यामुळे सिडनीतील सामना हा निव्वळ औपचारिकतेपुरता उरला आहे. हा सामना जिंकून भारत व्हाईटवॉश टाळतो का ? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.


ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये झालेला पहिला एकदिवसीय सामना सात गडी राखून डकवर्थ लुईस नियमाने जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेडचा एकदिवसीय सामना दोन गडी राखून जिंकला.


पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ऑस्ट्रेलियाला फायद्याचे ठरले. अ‍ॅडलेड येथील सामन्यात भारताने ५० षटकांत नऊ बाद २६४ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियापुढे ५० षटकांत २६५ धावा करण्याचे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाने ४६.२ षटकांत आठ बाद २६५ धावा करुन सामना जिंकला.


अ‍ॅडलेडच्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ११, टी. हेडने २८, मॅथ्यू शॉर्टने ७४, मॅट रेनशॉने ३०, अ‍ॅलेक्स कॅरीने ९, कूपर कॉनोली नाबाद ६१, मिचेल ओवेनने ३६, झेवियर बार्टलेटने ३, मिचेल स्टार्कने ४, झम्पाने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी २ तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १ बळी घेतला. याआधी भारताकडून रोहित शर्माने ७३, शुभमन गिलने ९, विराट कोहलीने शून्य, श्रेयस अय्यरने ६१, अक्षर पटेलने ४४, केएल राहुलने ११, वॉशिंग्टन सुंदरने १२, नितीश रेड्डीने ८, हर्षित राणाने नाबाद २४, अर्शदीपने १३, मोहम्मद सिराजने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून झम्पाने ४, बार्टलेटने ३ आणि स्टार्कने २ बळी घेतले.


Comments
Add Comment

भारताचा विजय, पुढील फेरीची आशा कायम; दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपले

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीचे आजचे दोन्ही सामने सुपरहिट झाले. दक्षिण

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती