महापालिकेत निवडणुकीची लगबग, महापौरांसह विविध अध्यक्ष, पक्ष कार्यालयांच्या डागडुजीला सुरुवात


मुंबई(सचिन धानजी) : राज्यातील मुंबई महापालिकेसहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रभाग रचना केल्यानंतर आता मतदार याद्या सुधारीत करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक प्रक्रिया येत्या काही महिन्यांतच पूर्ण होऊन महापालिका स्थापन होईल अशी चिन्हे दिसू लागली आहे. त्यामुळे महापालिका स्थापन झाल्यास महापौर, उपमहापौर, सभागृहनेते विरोधी पक्षनेते यांच्यासह विविध वैधानिक आणि विशेष समित्यांची दालनेही चकाचक करण्याची वेळ आली आहे. त्याच दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेने महापौरांसह नेत्यांच्या तसेच समिती अध्यक्षांच्या दालनांचे नूतनीकरणाचे काम हाती घेत त्याची रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई महापालिकेचा कार्यकाल ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात झाल्यानंतर ०८ मार्च २०२२ पासून महानगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. तेव्हापासून महानगरपालिका आणि त्याअंतर्गत तिच्या समित्या अस्तित्वात नाहीत. त्यामुळे महापौर कार्यालय, विविध वैधानिक तसेच विशेष समिती अध्यक्ष कार्यालय, सभागृह नेते कार्यालय, विरोधी पक्षनेते कार्यालय इत्यादी विविध कार्यालये बंद आहेत. तसेच प्रशासकांच्या निर्देशानुसार सर्व महापालिका पक्ष कार्यालये सीलबंद करण्यात आली आहेत. तेव्हापासून जवळजवळ तीन वर्षे देखभालीअभावी कार्यालयांची दुरवस्था झाली आहे.


या कार्यालयांना वाळवी लागल्याने ही कार्यालये आता वापरण्याच्या स्थितीत नाहीत. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सर्व दालनांसह कार्यालयांची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वच दालनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळवी लागून फर्निचर, दरवाजे, खिडक्या आणि इतर लाकडी सामान वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात भिंतीवरील रंग उडला गेला आहे, भिंती-छत फरशीमध्येही भेगा पडणे, दरवाजा खिडक्यांच्या बिजागऱ्या तुटणे आदी प्रकारे कार्यालयांची दुरवस्था झालेली आहे.


त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर महापालिका स्थापन झाल्यानंतर महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, विविध पक्ष कार्यालये उसेच वैधानिक आणि विशेष समिती अध्यक्षांची दालने सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीकोनातून डागडुजीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी जे पी इन्फाप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली असून या डागडुजीच्या कामांसाठी विविध करांतह १.२२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.



दालने तथा कार्यालयांच्या नूतनीकरणात या कामांचा समावेश


कार्यालयांच्या दगडी भिंतीना पडलेल्या भंगा बंद करणे, दगडी बांधकामाव्या पृष्ठभागाची सौम्य स्वच्छता. लाकडी सामान आणि फर्निचरला मेलामाइन पॉलिश लावणे. खिडक्यावरील साराय झालेले रोलर स्लाईडस् बदलणे. मिती, छत, इत्यादीचे रंगकाम, वाळवीविरोधी उपचार पॉशरूम, टॉयलेट, पैट्री स्पेस, इत्यादीच्या खराब झालेल्या प्लंबिंग फिक्स्चरची दुरुस्ती, विविध विद्युत कामे इ.


Comments
Add Comment

दहा महिन्यांमध्ये गॅस सिलिंडर स्फोटांच्या ४७ दुघर्टना... एवढ्यांचे बळी, एवढे झाले जखमी

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईमध्ये सध्या आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढत होत असून यामध्ये प्राधान्य क्रम हा सदोष

ओशिवरा नाल्यावरील पुलाचा खर्च वाढला, तब्बल ४० टक्क्यांनी अधिक वाढ

मुंबई (सचिन धानजी) : गोरेगाव (पश्चिम) एस व्ही रोडवरील ओशिवरा नाल्यावरील पुल पाडून नव्याने त्याची पुनर्बांधणी

दिवाळी पाडवा: जाणून घ्या महत्त्व आणि साजरा करण्याची पद्धत 

मुंबई: दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. दिवाळीच्या

निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीने नवी योजना आणली असून आता कंत्राटी

मराठी संस्कृती जपणारे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजन करणार - शेलार

मुंबई : ग. दि. माडगूळकर, जगदिश खेबुडकर आणि मंगेश पाडगांवकर या शब्द प्रभूच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मराठी

दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो : उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई : दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा