महायुतीच्या आमदारांना सामाजिक न्याय मंत्र्यांकडून प्रत्येकी २ कोटींचा विकासनिधी वाटप

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांना दिवाळी भेट दिली आहे. मंत्री श्री. शिरसाट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी २ कोटींचा निधी मंजूर करून वितरित केला आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जातात. ही योजना राज्यातील लोकप्रिय योजनांपैकी एक असून, आमदार, खासदार, मंत्री व इतर लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक विकासासाठी निधी देण्यात येतो.

गेल्या काही महिन्यांपासून अनेक लोकप्रतिनिधींकडून निधीची मागणी होत होती. उपलब्ध निधी आणि मागणी यामध्ये समतोल राखत, मंत्री श्री.शिरसाट यांनी प्रथमच विधानसभेत निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांना २ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

दिवाळीपूर्वी हा निधी वितरित झाल्याने आमदारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या निर्णयामुळे दलित वस्त्यांतील विकासकामांना गती मिळणार असल्याचे मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन झाले कमी, उबाठाचे वाढले

भाजपच गड तरीही सावरु शकले नाही शिवसेनेला, विक्रोळीत वाढवली आपली अधिक ताकद सचिन धानजी मुंबई : मुंबई

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी

सात जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील २४ तास ढगाळ वातावरण मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून

यूजीसीच्या नव्या नियमाविरोधात विद्यार्थी आक्रमक

देशभरातील विद्यार्थी चळवळीत संतापाचे वातावरण मुंबई : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, दिव्यांग आणि

सांताक्रूझ ते चेंबूर- लिंक रोड कनेक्टरचे काम दोन महिन्यात होणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान

मुंबई महापालिकेत पक्ष कार्यालयासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होवून

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत डॉ. भूषण गगराणी राहणार पिठासीन अधिकारी

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी यापूर्वी पिठासीन अधिकारी म्हणून