नाचणीचे बिस्कीट

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे


दिवाळीचा फराळ म्हटलं की गोड, तूप, साखर आणि सुगंध यांचा संगम आठवतो. पण आजच्या आरोग्य-जागरूक युगात पारंपरिक गोडधोडाला नवी झळाळी द्यायची असेल, तर नाचणीचे बिस्कीट हा एक उत्तम पर्याय आहे. नाचणीचं पीठ, थोडंसं साजूक तूप आणि गूळ. एवढंच काय ते साधं पण चविष्ट मिश्रण! प्रत्येक घासात लहानपनीची आठवण आणि आरोग्याचा स्पर्श.


साहित्य :
नाचणी पीठ : १ कप
गव्हाचं पीठ : अर्धा कप
साजूक तूप : अर्धा कप
गूळ : अर्धा कप (किसलेला)
वेलदोडा पावडर : अर्धा टीस्पून
बेकिंग पावडर : अर्धा टीस्पून
दूध : २ ते ३ टेबलस्पून (आवश्यकतेनुसार)
चिमूटभर मीठ


कृती :
एका पॅनमध्ये तूप आणि किसलेला गूळ मंद आचेवर वितळवा. गूळ पूर्ण विरघळल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
एका बाऊलमध्ये नाचणी पीठ, गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर, मीठ आणि वेलदोडा पावडर एकत्र करा. चाळणीने २-३ वेळा चाळून घ्या.
थंड झालेलं गुळाचं मिश्रण पीठात घालून एकसंध गोळा मळा.
थोडं दूध घालून घट्टसर पण मऊ गोळा तयार करा.
गोळा लाटून कुकी-कटरने हवे तसे आकार कापा.
ओव्हन १८० अंश सेल्सिएसवर गरम करून n बिस्कीट १५–१८ मिनिटं बेक करा.
बाहेर काढून थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.


टीप :
जास्त कुरकुरीत हवे असल्यास थोडं जास्त तूप वापरा.
मुलांसाठी चव वाढवायची असेल तर थोडं कोको पावडर किंवा बारीक चिरलेला ड्रायफ्रूटही घालू शकता.

Comments
Add Comment

परंपरेला आधुनिकतेचा साज

गायत्री डोंगरे मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यातील शेती संबंधित असा सण आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतांत

साहित्यिक कर्मयोगिनी

कर्तृत्ववान ती राज्ञी : चित्रा कुलकर्णी मराठी साहित्यविश्वात गेली अनेक वर्षे निष्ठेने, सातत्याने आणि सामाजिक

स्वतःची किंमत ओळखा

मीनाक्षी जगदाळे लोकांनी तुम्हाला 'चांगले' म्हणावे यापेक्षा लोकांनी तुमचा 'आदर' करावा हे जास्त महत्त्वाचे आहे.

योग : अंध:काराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग 

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके योगिनींनो, म्हणता म्हणता २०२५ हे वर्ष सरलं आणि निरोप घ्यायची वेळ आली सुद्धा.

ओट्स–दुधाची खीर (डायबेटिक-फ्रेंडली)

सुग्रास सुगरण :  गायत्री डोंगरे मधुमेही देखील खाऊ शकतील अशी ओट्स–दुधाची खीर. साधी आहे, पचायला हलकी आहे आणि

कलमधारिणी वीर नारी

मोहिनी गर्गे - कुलकर्णी : कर्तृत्ववान ती राज्ञी वैशाली गायकवाड आयुष्याचा प्रवास कधीही सरळ रेषेत नसतो; तो