मागील २२ महिन्यांमध्ये फटाक्यांमुळे १८२ आगीच्या दुघर्टना..

मुंबई (सचिन धानजी): मुंबईत यंदा दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजींमुळे आगीच्या दुघर्टना घडण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फटाके फोडण्यासाठी काय काळजी घेतली जावी याबाबतची मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तरीही फटाके फोडताना नागरिकांकडून काळजी घेतली जात नसून रविवारी मध्य रात्री रॉकेटमुळे शिंपोली मेगा पार्टी हॉलसमोरील मॉर्डन ग्लास हाऊस येथे आग लागण्याची दुघर्टना घडली. यात कुठलीही जिवित हानी झाली नसली तरी मोठ्याप्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या काळात सर्वांधित आगीच्या घटना घडत असून मागील २२ महिन्यांमध्ये तब्बल १८२ अशाप्रकारच्य घटना घडल्याची आकडेवारी समोर येत आहे.


बोरीवली शिंपोली येथे एका फटाक्याचे रॉकेट जवळच्या दुकानाजवळ पडले आणि यामुळे लागलेल्या आगीमध्ये चार दुकानांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचे कार्य हाती घेतल्याने ही आग पुढेपर्यंत पसरली गेली नाही. मुंबई अग्निशमन दल, आणि पोलिस विभागाच्या तत्परतेमुळे आणि समन्वयामुळे आग शेजारच्या द्वारका हॉटेलपर्यंत पोहोचण्यापूर्वीच आटोक्यात आणण्यात आली,असे स्थानिक भाजपाचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.


मुंबईत दिवाळीच्या सणामध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जात असल्याने उडणाऱ्या फटाक्यांच्या सुरक्षिततेचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे बनवली आहे. त्यामुळे फटाक्यातील रॉकेट फोडताना रॉकेटसाठी स्थिर आणि सरळ बाटली किंवा पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून योग्य स्टँड वापरले जावे अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत.


विशेष म्हणजे या दिवाळीचा सणामध्ये सोमवारपर्यंत फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात २७ फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या, तर नोव्हेंबर २०२४ रोजी ११३ दुघर्टना घडल्या होत्य. त्यामुळे मागील २२ महिन्यांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या तब्बल १८२ घटना घडल्या आहेत. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी रविंद्र अंबुलगेकर यांनी यंदाची दिवाळी अग्नि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चांगली जावी याकरता नागरिकांनी उडणाऱ्या फटाक्यांबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे लहान मुलांनी एकट्याने फटाके फोडण्याऐवजी प्रौढ व्यक्ती सोबत असतानाच फटाके फोडावे असे स्पष्ट केले आहे.

फटाके फोडण्यासंदर्भात अग्निशमन दलाने जाहीर केलेल्या सूचना


उडणारे फटाके पेटवण्यापूर्वी...


प्रौढांची देखरेख असावी - लहान मुलांना कधीही एकटे फटाके उडवू देऊ नका.


मोकळी जागा निवडा - घर, झाडे, वीजेच्या तारा आणि ज्वलनशील वस्तूं पासून दूर असलेली.


वाऱ्याची दिशा पहा - वारा जोरात असल्यास फटाके उडवू नका, ते चुकीच्या दिशेने जाऊ शकतात.


योग्य स्टैंड वापरा- रॉकेटसाठी स्थिर आणि सरळ बाटली किंवा पीव्हीसी पाईप वापरा.


सुरक्षित अंतर ठेवा - फटाके उडवण्याच्या जागेपासून सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवा.


फटाके पेटवताना...


सुरक्षित कपडे घाला: सूती कपडे, बंद बूट आणि सुरक्षात्मक चष्मा वापरा.


लांब अगरबत्ती / मेणबत्ती वापरा : थेट माचिस किंवा लायटर वापरू नका.


एकावेळी एकच फटाका पेटवा: घाई नको, संयम ठेवा.


कधीही वाकून फटाका पेटवू नका: रॉकेट पेटवताना नेहमी सरळ उभे राहा.

काही गडबड झाल्यास काय करावे ?

फसलेला फटाका परत पेटवू नकाः तो १५ मिनिटे तसाच सोडा आणि नंतर पाण्यात टाका.

पाणी व वाळू जवळ ठेवाः आग लागल्यास पाणी, वाळू किंवा फायर एक्स्टेिंग्विशर वापरून त्वरित आग विझवा.


प्राथमिक उपचारः भाजल्यास थंड पाण्याने धुवा; गंभीर जखम असल्यास डॉक्टरांकडे जा.


काय करू नये ?


रॉकेट लोकांकडे, प्राण्यांकडे किंवा घरांकडे वळवू नका.


फटाके खिशात ठेवू नका.


फटाक्यांमध्ये कोणतीही फेरफार करू नका

Comments
Add Comment

Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ! महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मुंबई महापौर कार्यालय,

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये वडाळाजवळ पुरुषाकडून महिलेला बेदम मारहाण; बेल्ट काढून धमकी, सहप्रवाशी ठरले मूकदर्शक!

मुंबई : मुंबईकरांची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या 'लोकल ट्रेन' (Mumbai Local Train) मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा

Birthday Celebration Firing : 'बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा'; रस्त्यात सेलिब्रेशन अन् बेबी एअरगनमधून गोळीबार महागात पडली

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बेबी एअरगनमधून गोळीबार;10 जणांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी ताब्यात बोरिवली :

Publications Banned : अतिरेकी विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या ११४ प्रकाशनांवर बंदी

- राज्य सरकारचा निर्णय; 'काश्मीर किफाह – रेझिलियन्स अँड करेज', 'नवाई गझवा-ए-हिंद'चा समावेश मुंबई : हिंसक अतिरेकी

Mumbai News : गृहनिर्माण सोसायट्यांनी पदपथांवरील रॅम्प, अतिक्रमणे तातडीने हटवावेत; अन्यथा कठोर कारवाई

महापालिका आयुक्तांचे इशारावजा आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे आणि

Mumbai Mandai News : मुंबईतील मंड्यांच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक घेणार निर्णय

स्थायी समितीच्यावतीने होणार विशेष बैठक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास रखडलेला असून