दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी


फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही पारा वाढून 'अतिशय खराब' श्रेणीत; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर


नवी दिल्ली/मुंबई: दिवाळीच्या रात्री झालेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीमुळे दिल्ली आणि मुंबई दोन्ही महानगरांमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. यामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांना श्वास घेण्यास अडचण येत आहे.

दिल्लीचा श्वास कोंडला, AQI ४०० पार


दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) हवेची गुणवत्ता 'अतिशय खराब' ते 'गंभीर' श्रेणीत पोहोचली आहे. आज, मंगळवारी सकाळी दिल्लीचा एअर क्वॉलिटी इंडेक्स (AQI) ४०० च्या वर नोंदवण्यात आला. अनेक भागांमध्ये हा निर्देशांक ४२० पर्यंत गेला, जो थेट 'गंभीर' श्रेणीत मोडतो.

परिणामी, दिल्ली-एनसीआरमधील हवा अत्यंत विषारी झाली असून, लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. शांत हवामान आणि फटाक्यांचा धूर एकत्र आल्याने प्रदूषणाचे कण हवेत तसेच साचून राहिले आहेत.

मुंबईकरांचेही आरोग्य धोक्यात


दिल्लीप्रमाणेच आर्थिक राजधानी मुंबईची हवाही अत्यंत खालावली आहे. दिवाळीनंतर मुंबईच्या अनेक भागांमध्ये AQI 'अतिशय खराब' श्रेणीत नोंदवण्यात आला आहे.

आज, मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबईच्या काही भागांत AQI मध्ये मोठी वाढ झाली असून, कुलाबा येथील वेधशाळेजवळ AQI ३४१ पर्यंत नोंदवला गेला. तसेच, वांद्रे, माझगाव आणि चेंबूर यांसारख्या भागांमध्येही निर्देशांक ३०० च्या आसपास किंवा त्याहून अधिक होता. मान्सून माघारी गेल्यानंतर मुंबईमध्ये यंदा प्रथमच इतका उच्च AQI नोंदवण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

AQI नुसार हवेच्या गुणवत्तेची श्रेणी:


०-५०: चांगली (Good)


५१-१००: समाधानकारक (Satisfactory)


१०१-२००: मध्यम (Moderate)


२०१-३००: खराब (Poor)


३०१-४००: अतिशय खराब (Very Poor)


४०१-५००: गंभीर (Severe)


दरम्यान, आणखी दोन दिवस दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यात येणार असल्याने प्रदूषणाची पातळी वाढतच रहाणार आहे. त्यामुळे, दिल्ली आणि मुंबईतील श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या नागरिकांना घरात राहण्याचा आणि अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च