तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच पाण्याची तीव्र समस्या निर्माण होवू लागली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये सध्या कमी दाबाने पुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या अपुऱ्या दाबामुळे निर्माण झालेल्या पाणी समस्येबाबत विविध विभागांमधून नागरिकांच्या आणि पर्यायाने नगरसेवकांच्या तक्रारी येत असल्याने आता अधिकारीही हैराण झाले आहेत. मात्र, ही पाणी समस्या ऑक्टोबर हिट, दिवाळीचा सण आणि होवू घातलेली संभाव्य महापालिका निवडणूक हेच याला कारणीभूत असल्याचे समोर येत आहे


मुंबईला दरदिवशी विविध धरण आणि तलावांमध्ये सुमारे ४ हजार दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जात असून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत तलावातील उपलब्ध साठ्यानुसार ९९.५० टक्के एवढा पाणी साठा जमा झाला होता. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा आवश्यक असतो. त्यामुळे यंदा पुरेसा पाऊस पडून तलाव आणि धरणे भरल्यानंतरही मुंबईत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध भागांमध्ये पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचा पाऊस महापालिकेच्या कार्यालयांमध्ये पडलेला पहायला मिळत आहे. दिवाळीच्या तोंडावरच पाण्याच्या समस्या निर्माण झाल्याने लोकप्रतिनिधी प्रचंड आक्रमक बनलेले पहायला मिळत आहे.




गोकुळधाम परिसरात अशाचप्रकारे कमी दाबाने पाणी येत असल्याने स्थानिक भाजपाच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी महापालिका जलअभियंता यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले होते, तर जोगेश्वरी पूर्व भागांमध्ये पाणी समस्येबाबत उबाठा शिवसेनेचे आमदार बाळा नर यांनीही महापालिका के पूर्व विभागाचे सहायक आयुक्तांची भेट घेवून तक्रार मांडण्याचा प्रयत्न केला होता, तर भाजपाचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी अंधेरी पूर्व येथील पोदारवाडी,शहाजी राजे रोड काही विभाग, छत्रपती शिवाजी महाराज नगर, कोलडोंगरी गली नं २ , विजयनगर येथील अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत कार्यकारी अभियंता (जल विभाग) जैन, सहायक अभियंता (जल विभाग) शिंदे आणि के पूर्व जल विभागाच्या अभियंत्यांसोबत संक्षिप्त बैठक घेत चर्चा करत पाण्याच्या कमतरतेच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्याच्या सूचना केल्या.


परंतु याबाबत महापालिका जलअभियंता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईला दैनंदिन ४१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो, पण तक्रारीनंतर हा पाणी पुरवठा ४१५७ दशलक्ष लिटर पर्यंत वाढवून दिला जात आहे. सध्या ऑक्टोबर हिट असल्यामुळे आधीच पाण्याची मागणी वाढते. त्यातच दिवाळीचा सण असल्याने साफसफाई आणि इतर बाबींसाठीही जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळेच पाण्याची मागणी ही या कालावधीत वाढली जाते. त्यातच आता आगामी काळात महापालिका सार्वत्रिक निवडणूक डोळयासमोर असल्याने काही इच्छुक तसेच विद्यमान माजी नगरसेवक हे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याच्या समस्येचा मुद्दा अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुख्य जलवाहिनीतून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कुठेही कमी पाणी नाही, त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यताच नाही. अंतर्गत जलवाहिन्यांमधील पुरवठ्यात काही अडचणी असल्यास सोसायटी तथा इमारतींसह वस्त्यांना कमी पाणी पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या शक्यता लक्षात घेता जलअभियंता विभागाचे अभियंता पाहणी करत आहेत आणि लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करत आहे

Comments
Add Comment

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा