मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत तब्बल ३२५९ कोटी रुपये एवढी झाली आहे. महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाच्या माध्यमातून वसूल करण्यात येणाऱ्या या मालमत्ता कराचे वार्षिक टार्गेट हे ७३०० कोटी रुपये एवढे ठेवण्या आले आहे. त्यामुळे वार्षिक लक्ष्याच्या तुलनेत सुमारे ४५ टक्क्यांच्या आसपास या कराची वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये वर्षांचे टार्गेट असलेल्या मालमत्ता कराची रक्कम वसूल करतानाच जुन्या मोठ्या थकबाकीदारांकडील कराची वसुली करून निश्चित केलेल्या वार्षिक करापेक्षा अधिक महसूल जमा करण्याचे महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाचे लक्ष्य आहे.मागील आर्थिक वर्षात म्हणजे सन २०२४-२०२५मध्ये महापालिकेने ६, १९८ कोटी रुपये एवढा विक्रमी मालमत्ता कर वसूल केला होता.
आजवरच्या महापालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक कर होता. मुंबई महापालिकेने करदात्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.तसेच वेळेवर कर भरणाऱ्या तथा थकबाकीदारांसाठी सवलतींचीही घोषणा तसेच थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचे पाऊल उचलत कर वसुलीवर जोर दिला जात आहे. मालमत्ता कराची देयके वेळेवर न मिळाल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, महापालिकेने देयके वितरणाची प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यावर भर दिला आहे. कराची देयके उशिराने पाठवण्यात आल्याने देयके भरण्यासाठी जो ९० दिवसांचा कालावधी दिला जातो तो नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे. त्यामुळे काही निवासी इमारती तथा सोसायट्यांकडून या कराची रक्कम तातडीने भरली जात असली तरी काही कमर्शियल कंपन्या तथा संस्थांकडून या कराची देयके ही कालावधी संपण्यापूर्वी भरण्याकडे कल असतो.
मात्र,आतापर्यंत ३१ मार्च २०२६ पर्यंत या कराची वसूली करण्यात येणाऱ्या एकूण महसूलापैंकी आतापर्यंत ३२५० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. देयके उशिराने पाठवल्यानंतरही मालमत्ता कराची रक्कम आतापर्यंत सुमारे ४५ टक्के वसूल झाली आहे. त्यामुळे येत्या काळात उर्वरीत कराची रक्कम वसूल करण्यावर भर राहिल आणि मोठ्या थकबाकीदारांकडूनही कराची वसुली केली जाईल,असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. करनिर्धारण व संकलन विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्याकडे असून सहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली २५ प्रशासकीय विभाग कार्यालयांमधील करनिर्धारण व संकलन अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट देत हे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Dr Sarika Chapane October 21, 2025 07:39 AM
Make online property tax paying method mandetary
Arun Mordekar October 20, 2025 07:08 AM
Anubhav CHS plot 96 Gorai 2 Borivali West have paid total Property Tax regularly. We had submitted on four occasion photo copies of paid receipt with Excel sheet But no action from BMC inspite of repeated emails to the Commissioner. Commissioner can we expect mandatory service from your end