नवी मुंबईत उभारले जाणार देशातील सर्वात मोठे रेडिएशन थेरपी केंद्र

३.४ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर ११ मजली इमारत राहणार उभी


मुंबई : कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी नवी मुंबईतील टाटा मेमोरियलच्या प्रगत केंद्रात नवीन कॅन्सर केअर इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची घोषणा आयसीआयसीआय बँक आणि टाटा मेमोरियल सेंटरने केली आहे. बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ६२५ कोटी रुपयांच्या योगदानाच्या साहाय्याने हे केंद्र भारतातील रेडिएशन थेरपी केंद्रांपैकी एक असणार आहे. ‘आयसीआयसीआय फाऊंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे भूमीपूजन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष प्रदीप कुमार सिन्हा, कार्यकारी संचालक संदीप बत्रा, कार्यकारी संचालक अजय गुप्ता आणि टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता हे यावेळी उपस्थित होते.


तळमजला तसेच दोन बेसमेंट असलेली ११ मजली इमारत ३.४ लाख चौरस फुटांवर बांधली जाणार आहे. यामध्ये १२ अत्याधुनिक लिनियर एक्सीलरेटर्स आणि कर्करोगाशी संबंधित इतर प्रगत उपकरणे असणार आहे. ‘आयसीआयसीआय फाऊंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ दरवर्षी ७ हजार २०० रुग्णांना रेडिएशन थेरपीची सोय उपलब्ध करून देणार आहेत. या अंतर्गत रुग्णांची दोन लाखांहून अधिक रेडिएशन सत्रांची सोय केली जाणार आहे. या व्यतिरिक्त, वर्षभरात २५ हजार नवीन रुग्णांना ओपीडी सल्ला तसेच निदान करण्यास मदत करेल. हे केंद्र २०२७ पर्यंत पूर्ण होणार असल्याची चिन्हे आहेत. आयसीआयसीआय बँकेची सीएसआर शाखा, आयसीआयसीआय फाऊंडेशन फॉर इन्क्लुजिव्ह ग्रोथ, या केंद्राचे बांधकाम आणि एकूणच कामकाजावर देखरेख ठेवणार आहे.


या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष प्रदीप कुमार सिन्हा म्हणाले, “आयसीआयसीआय फाऊंडेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ या आपल्या सीएसआर शाखेद्वारे आयसीआयसीआय बँक आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका आणि सामुदायिक विकास प्रकल्प या चार संकल्पनांवर काम करत आहे. देशातील महत्त्वाच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या आमच्या प्रयत्न आहे. कर्करोग काळजी मोहिमेत टीएमसीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर आणि संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर ‘आयसीआयसीआय फाऊंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ रेडिएशन थेरपीसाठी भारतातील सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक असणार आहे.' आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक संदीप बत्रा म्हणाले, देशातील कर्करोगासाठी आवश्यक आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.


विशाखापट्टणम, नवी मुंबई आणि मुल्लानपूर येथे तीन नवीन कॅन्सर केअर रुग्णालये स्थापन करण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटरला १,८०० कोटी रुपये देण्याचे आमचे आश्वासन आहे. तर, नवी मुंबईतील ही नवीन इमारत अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज असेल.”

Comments
Add Comment

अवधूत साठे 'धर्मसंकटात' ६०१ कोटींच्या दंडासह बाजारातूनही बंदी सेबीने आदेशात दिली विस्तृत माहिती

मुंबई: सेबीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवधूत साठे यांच्याकडून ६०१ कोटीचा दंड वसूली केला जाणार असून

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

देवेंद्र फडणवीस ३.० ची यशोगाथा

महाराष्ट्रासाठी ‘गोल्डन इयर’ सुहास शेलार मुंबई : ५ डिसेंबर २०२४ चा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. हजारो

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची निवडणूक संचालन समिती जाहीर

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. ज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान

Dollar Rupee Rate: पतधोरण समितीच्या पार्श्वभूमीवर एका तासात ४० पैशाने रूपया घसरला 'ही' आहेत कारणे !

मोहित सोमण:आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद