भीषण अपघातात विमान धावपट्टीवरून थेट समुद्रात कोसळलं

मुंबई : अहमदाबाद विमान अपघातानंतर अलीकडे सतत विमान अपघातांची संख्या वाढलेली दिसते. हवाई प्रवास हा सुखकर, सोयीस्कर आणि सुरक्षित मानला जायचा. पण यात सुद्धा अपपघातांचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसून येते.
आजची एक मोठी विमान दुर्घटना घडली ती हाँगकाँगमध्ये.
सोमवारी हाँगकाँगच्या एका कार्गो म्हणजे मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरलं ते थेट समुद्रात जाऊन कोसळलं. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.


हे विमान तुर्कीची मालवाहतूक करणाऱ्या एअर लाईन कंपनीचे होते. एमिरेट्स हे विमान EK९७८८, बोईंग ७४७-४८१ , स्थानिक वेळेनुसार जवळपास ०३ : ५० मिनिटांनी दुबईवरून येत होतं. धावपट्टीवर एका वाहनाशी या विमानाची टक्कर झाली.


जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवलं


विमानतळावरील दोन ग्राउंड स्टाफ समुद्रात पडले असं सिविल एव्हिएशन डिपार्टमेंट कडून सांगण्यात आले. त्यांना रुग्णालयात हलवले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विमानातून प्रवास करणारे चालक दलाच्या चार सदस्यांचे प्राण वाचले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आल आहे.


हेलिकॉप्टर्स तैनात


ज्या धावपट्टीवर दुर्घटना घडली तो बंद करण्यात आला आहे. पण विमानतळावरील इतर दोन धावपट्ट्या सुरु आहेत. या प्रकरणी एअरपोर्ट प्रशासन लवकरच पत्रकार आप्रीषध घेणार आहे. रनवे वर हेलिकॉप्टर्स तैनात केले आहे. फायर ब्रिगेडच्या बोटी मदत बचाव कार्यात गुंतल्या आहेत.


हा असा अपघात दुर्मिळच


विमानतळ प्राधिकरणाने आपल्या वेब साईट वर दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी कमीत कमी ११ कार्गो फ्लाईट्स रद्द करण्यात आली आहेत. या विमानतळाचा सुरक्षा रेकॉर्ड खूप उत्तम आहे. तरी सुद्धा असा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

पॅरिसमधील प्रसिद्ध लूव्र संग्रहालयात चोरी, घटनेनंतर संग्रहालय बंद

लंडन : पॅरिसमधील प्रसिद्ध लूव्र म्युझियममध्ये चोरीची घटना घडल्याने म्युझियम एक दिवसासाठी अचानक बंद करण्यात आले

अमेरिकेत ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात 'नो किंग्ज' आंदोलन, हजारो नागरिक रस्त्यावर!

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाशाहीविरोधात वॉशिंग्टन डीसीपासून ते

Bangladesh News : ढाका विमानतळात भीषण आग! विमानतळाचे कार्गो क्षेत्र आगीच्या विळख्यात; धुरामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. ढाका येथील हजरत शाहजलाल

पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानचे ३ क्रिकेटपटू ठार; अफगाण क्रिकेटसाठी काळा दिवस! अफगाण क्रिकेट बोर्डाचा ठाम निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये सीमा भागात तणावाचं वातावरण

मला लोकांना मारण्यापासून रोखणे आवडते, नोबेल शांतता पुरस्काराबाबत ट्र्म्प झाले व्यक्त

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्यामुळे दुःख व्यक्त

स्वीडन दौऱ्यावर मंत्री नितेश राणे, लवकरच मुंबईत जलवाहतुकीत क्रांती

कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची केली पाहणी स्वीडन : मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या