प्रतिनिधी:देशातील थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) झालेली वाढ ही जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढते आकर्षण दर्शवते असे विधान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी अधोरेखित केले की जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात ५०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये गोयल म्हणाले, 'गेल्या काही महिन्यांतच, जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात ५ ०००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत.' गोयल म्हणाले की, जागतिक अडचणींमध्ये, भारत गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे ठिकाण बनले आहे.
ते यापुढे म्हणाले आहेत की, अशांत काळातही भारत एक पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे, कारण देशात थेट परकीय गुंतवणूकीचा प्रवाह जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या दूरदर्शी सुधारणा आणि वित्तीय आणि बँकिंग परिसंस्थेसाठी मजबूत पाया तयार करण्यासाठी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा मजबूत प्रवाह चालत आहे.'गेल्या काही महिन्यांतच, प्रमुख गुंतवणूकदारांनी भारताच्या वित्त आणि बँकिंग क्षेत्रात जोरदार रस दाखवला आहे आणि ५०००० कोटी रुपयांपेक्षा जा स्त किमतीच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे, असे पियुष गोयल यांनी नमूद केले आहे.
थेट परकीय गुंतवणुकीतील ही वाढ केवळ भारताच्या आर्थिक क्षमतेवरील वाढत्या जागतिक विश्वासाचेच प्रतीक नाही तर विकित भारत २०४७ च्या दृष्टिकोनातून देशाची प्रगती देखील मजबूत करते असे त्यांनी स्पष्ट केले. गोयल यांच्या मते, भारताची धोरणात्मक स्थिरता, सुधारणा-केंद्रित प्रशासन आणि मजबूत आर्थिक पायाभूत सुविधा यामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी हे सर्वात आकर्षक ठिकाण बनले आहे.
तत्पूर्वी, मंत्री गोयल यांनी शनिवारी असा विश्वास व्यक्त केला होता की जागतिक व्यापारातील अनिश्चितता असूनही भारत या आर्थिक वर्षात निर्यातीत सकारात्मक वाढ पाहेल. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दर सुसूत्रीकरणाच्या परिणामांवरील राष्ट्रीय राजधा नीत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले आहेत की या सर्व अनिश्चितता असूनही, निर्यात एकूण ६% किंवा ७% वाढली आहे, आणि व्यापारातही, आम्ही पहिल्या सहा महिन्यांत भारताची चांगली कहाणी पाहिली आहे.जगभरात लवचिकता आहे, आत्मविश्वास आहे, आपल्या वस्तू आणि सेवांना मागणी आहे आणि भारत या वाढीच्या मार्गावर पुढे जाईल' असे ते म्हणाले.
१५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये भारताची व्यापारी निर्यात ६.७५% वाढून ३६.३८ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे, जी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) आधारावर ३४.०८ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. तथा पि, आकडेवारीनुसार, व्यापारी आयात १६.७% वाढून ६८.५३ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे, जी इयर ऑन इयर बेसिसवर ५८.७४ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.