अ‍ॅटलीच्या आगामी सिनेमात दिसणार दीपिका आणि अल्लू अर्जुन... यावर काय म्हणाला रणवीर सिंह

मुंबई : जवान फेम दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अल्लू अर्जुन दिसणार आहेत दीपिका यामध्ये जबरदस्त ऍक्शन सीन्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसच दीपिका आणि अल्लू अर्जुन ही नवीन जोडी पहिल्यांदाच पदड्यावर झळकणार आहे. अल्लू अर्जुन हा साऊथचा सुपरस्टार आणि दीपिका ही बॉलीवूडची सुपरस्टार आणि तितकाच मोठा त्यांचा फॅनबेस सुद्धा आहे. त्यामुळे यांच्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.


रणवीर सिंग ने नुकतीच या सिनेमाच्या सेटला भेट दिली. दीपिकाच्या या चित्रपटविषयी बोलताना रणवीर म्हणाला ," मी अ‍ॅटलीच्या सेटवर गेलो होतो, दीपिकाचा शूट तिथे सुरु होतं. सिनेमाची स्केलच अशी आहे कि या आधी आपण कधीच पहिली नसेल, न भूतो न भविष्यती असा हा सिनेमा असणार आहे. मी बऱ्याच काळापासून अटली चा चाहता आहे. जवानच्या यशाआधी मी त्याचा " मर्सल " सिनेमा बघून प्रभावित झालो.


यावेळी त्याने बॉबी देओल आणि श्रीलीलाचेही कौतुक केले. श्रीलीला तर नॅशनल क्रश आहे. तिच्या आगामी सिनेमांबाबदल मला उत्सुकता आहे. ती मोठी स्टार बनेल. असे तो म्हणाला


रणवीर सिंग हा आगामी धुरंधर सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचे फोटो आणि व्हिडीओ वायरल झाले आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सोबत तगडी स्टारकास्ट आहे. संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, असे दिग्गज कलाकार आहेत, ५ डिसेंबर २०२५ रोजी सिनेमा भेटीला येत आहे.

Comments
Add Comment

नेटकरी मलायकावर भडकले! आधीच झाली ट्रोल, त्यात प्रतिक्रिया पण 'बोल्ड'; बघा Video

मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका

जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- 'ताठ कणा'

मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील

‘१२० बहादूर’चा जबरदस्त ट्रेलर

सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या

शो मस्ट गो ऑन...

टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल दाक्षिणात्य मातृभाषा असून देखील मराठी मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे

काव्यात रंगलेले ‘कुटुंब’ आणि प्रयोगातला ‘तो बॉक्स’...!

राजरंग - राज चिंचणकर कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कवितांचा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातल्या गावोगावी भ्रमंती