दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे आज (१९ ऑक्टोबर) दिवाळीच्या तिसऱ्या दिवशीही मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एग्झिटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत आहे.


१७ आणि १८ ऑक्टोबरलाही दिवसभर या भागात वाहनांचा मोठा ताण होता. आज तर खोपोली एग्झिटपासून खंडाळा घाटापर्यंत वाहनांची सुमारे तीन ते चार किलोमीटर लांब रांग लागल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासूनच वाहनांची वाढलेली संख्या आणि काही चालकांकडून लेन शिस्त न पाळल्याने एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ओव्हरटेकची स्पर्धा आणि वेगमर्यादा न पाळल्यानेही वाहतूक कोंडी अधिक वाढली आहे.


खंडाळा महामार्ग वाहतूक पोलीस सतत ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांचा ओघ एवढा मोठा असल्याने कोंडी कमी होताना दिसत नाही. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना आणि पर्यटकांना तासन् तास वाहनांमध्ये अडकून राहावे लागत आहे.



प्रवाशांचा संताप...


वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा संताप उफाळून आला असून, सणासुदीच्या काळात प्रशासनाने आधीच योग्य नियोजन का केलं नाही? असा सवाल नागरिक करत आहेत. दिवसा मोठ्या वाहनांना बंदी असतानाही अनेक जड वाहनं एक्सप्रेस वेवर धावत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, वाहनचालक, पर्यटक आणि प्रवासी या सर्वांनाच दिवाळीच्या उंबरठ्यावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Comments
Add Comment

'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मालिकेतील अभिनेता; ९ वर्षांपासून टीव्हीपासून दूर...

एकता कपूरच्या शोमध्ये "क्यूंकी सास भी कभी बहू थी" मधील एका पात्राची अजूनही चर्चा आहे. तो म्हणजे अंश, ज्याची भूमिका

मर्दानी ३ ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री; पहिल्याच दिवशी केली एवढी कमाई

बॉलिवूडची 'लेडी सिंघम' अर्थात राणी मुखर्जी पुन्हा एकदा मोठ्या पदडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचा

धक्कादायक! आयटीचे छापे पडताच बंगळुरुतील प्रसिद्ध बिल्डरने संपवलं स्वतःचं आयुष्य

बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष सी जे रॉय यांनी स्वतःला गोळी झाडून

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे

वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्ज विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल

चार नगरसेवकांविरोधात उबाठा गट आक्रमक

बेपत्ता नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू कल्याण : पक्षाचा आदेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील चार